फोटो – ट्विटर/ क्रिकेट ऑस्ट्रेलिया

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा (Cricket Australia) वार्षिक उत्सव असलेली ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ (Boxing Day Test) आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला सुरु होणारी टेस्ट ही बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखली जाते. यंदा कोरोना व्हायरसमुळे (COVID – 19) ही परंपरा मोडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, या सर्व अडचणींवर मात करुन नियोजित वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ही टेस्ट होणार आहे. या ऐतिहासिक टेस्टला यंदा आणखी खास बनवण्याचा निश्चय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला आहे. याचाच भाग म्हणून या टेस्टमध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला जॉनी मुलघ (Johnny Mulagh) पुरस्कार देण्यात येणार आहे.

कोण होते जॉनी मुलघ?

जॉनी मुलघ हे ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी टीमचे कॅप्टन होते. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने 1868 साली ब्रिटनचा दौरा केला होता. ती आंतरराष्ट्रीय दौरा करणारी पहिली ऑस्ट्रेलियन टीम होती. त्यांची आठवण म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

(वाचा : Big Bash League: ऑस्ट्रेलियन बॅट्समन्स केली 15 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी, ख्रिस गेलचा विक्रम थोडक्यात वाचला )

‘बॉक्सिंग डे टेस्ट’मध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला जॉनी मुलघ पुरस्कार देण्यात येईल. या पुरस्कारात 1868 साली  ब्रिटन दौरा करणाऱ्या मुलघ यांच्या टीमचा फोटो आहे. या फोटोला चारही बाजूने गोल्डन कलरची फ्रेम लावण्यात आली आहे. तसेच त्याची रिबीन हिरव्या रंगाची आहे.

संस्कृती जपण्याचा प्रयत्न

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा या वर्षातील हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांची पारंपारिक संस्कृती सांगणारी जर्सी देखील वन-डे मालिकेत घातली होती.

( वाचा : उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’! )

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिली टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलियाने या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी टेस्ट जिंकून या सीरिजचा निकाल मेलबर्नमध्येच जवळपास स्पष्ट करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. तर दुसरिकडे टीम इंडिया (Team India)  सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी मेलबर्न टेस्ट जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे दोन्ही टीममधल्या कोणत्या खेळाडूला हे ऐतिहासिक ‘जॉनी मुलघ मेडल’ मिळतं याची आता उत्सुकता आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: