फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ब्रिस्बेन टेस्टमध्ये (Brisbane Test) शुभमन गिलची (Shubman Gill)  पहिली टेस्ट सेंच्युरी अवघ्या 9 रननं हुकली. पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात संपूर्ण लयीमध्ये तो खेळत होता. अखेर त्याला 91 रनवर नॅथन लायननं  (Nathan Lyon) आऊट केलं. या मॅचमध्ये गिलची सेंच्युरी हुकली असली तरी त्यानं भारताचे महान खेळाडू सुनील गावस्करांचा (Sunil Gavasakar) 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.

गिलची जबरदस्त इनिंग!

ब्रिस्बेन टेस्टमध्ये पाचव्या दिवशी बिनबाद 4 या धावसंख्येवरुन (स्कोअर) टीम इंडियानं (Team India) खेळायला सुरुवात केली. ब्रिस्बेनमध्ये पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज होता. सकाळच्या सत्रात पाऊस आला नाही, पण गिलच्या बॅटमधून रन बरसले.

ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हणून सतत कौतुक केल्या जाणाऱ्या ब्रिस्बेनच्या गॅबा (Gabba) पिचवर 21 वर्षांच्या शुभमन गिलनं ऑस्ट्रेलियन बॉलर्सची शाळा घेतली. चौथ्या इनिंगमध्ये पाचव्या दिवशी गिलला ऑस्ट्रेलियाचे सर्व दिग्गज बॉलर्स बॉलिंग टाकत होते. ‘अमुक एक बॉलर नव्हता’ असं बोलण्याची सोय देखील नव्हती. त्या दिवशी गिलनं ऑसी बॉलर्सना त्याच्या बॅटचं पाणी पाजलं.

रोहित शर्मा (Rohit Sharma) अवघे सात रन काढून आऊट झाला, तरी गिलच्या खेळावर परिणाम झाला नाही. चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) संयमी खेळी करत एक बाजू लावून धरली. गिल दुसऱ्या बाजूनं नैसर्गिक खेळ करत होता. त्यानं टेस्ट क्रिकेटमधील दुसरी हाफ सेंच्युरी 90 बॉलमध्ये 5 फोरच्या मदतीनं पूर्ण केली. पुजारा-गिल जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 114 रन्सची पार्टरनरशिप केली. पहिल्या टेस्ट सेंच्युरीच्या उबंरठ्यावर पोहचलेला गिल 91 रनवर लायनच्या बॉलिंगवर आऊट झाला.   

गिलचा नवा रेकॉर्ड

ब्रिस्बेनमध्ये सेंच्युरी करण्याची गिलची संधी हुकली तरी त्यानं सुनील गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. गिल आता सर्वात लहान वयात चौथ्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा भारतीय बॅट्समन बनला आहे. 21 वर्ष आणि 133 दिवसांचा असताना गिलनं ही हाफ सेंच्युरी झळकावली.

यापूर्वी हा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. त्यांनी 1970-71 साली त्यांच्या पहिल्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पोर्ट ऑफ स्पेनमध्ये चौथ्या इनिंगमध्ये 67 रन काढले होते.

( वाचा : IND vs AUS – ‘हे’ आहेत मेलबर्नमधील टीम इंडियाच्या विजयाचे हिरो! )

गिलची पहिलीच सीरिज शुभमन गिलची ही पहिलीच टेस्ट सीरिज आहे. गिलनं या सीरिजमध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं या सीरिजमध्ये 45, 25, 50, 31, 7 आणि 91 असे एकूण 259 रन्स केले आहेत. त्याची पहिल्याच सीरिजमधील सरासरी ही 51.80 आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading