फोटो – रिपब्लिक टीव्ही

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात बॉलची छेडछाड केल्याच्या प्रकरणात स्टीव्हन स्मिथ (Steven Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) सापडले. त्या दोघांवर एक वर्षांची बंदी आली आणि अचानक टीम पेन (Tim Paine) ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झाला. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज हरणारा टीम पेन हा एकमेव कॅप्टन आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमने ऑस्ट्रेलियातील मागील टेस्ट सीरिज 2-1 ने जिंकली होती. या दौऱ्यातील पराभवाचे आजही शल्य जाणवते अशी कबुली टीम पेनने दिली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट 17 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरु होतीय. या टीममध्ये स्मिथ-वॉर्नरचं पुनरागमन झालंय. मात्र टीमचं नेतृत्व टीम पेनकडेच आहे. या टेस्ट सीरिजपूर्वी एका रेडिओ चॅनेलशी बोलताना पेनने मनातले शल्य बोलून दाखवले.

पेन म्हणाला, “ मी जेंव्हा त्याबाबत विचार करतो तेंव्हा अस्वस्थ होता. स्टीव्ह ( स्मिथ) आणि डेव्हिड (वॉर्नर) असो किंवा नसो मी खेळत असलेली कोणतीही टेस्ट मॅच किंवा सीरिज हरलेलं मला आवडत नाही. त्यामुळे मला त्या पराभवाबद्दल विचार करताना त्रास होतो.’’

ऑस्ट्रेलियन टीममध्ये त्या पराभवानंतर सुधारणा झाल्याचं पेनने सांगितले. “आमची टीम आता अधिक चांगली टीम आहे. स्टीव्ह (स्मिथ) आणि डेव्हिड (वॉर्नर) परत आल्याने आमची टीम अनुभवी बनलीय. या दोघांनी भरपूर रन्स केलेले आहेत. त्या टीममधील प्रत्येक खेळाडूत मागील 18 महिन्यांमध्ये बरीच सुधारणा झाली असल्याचं मला वाटतं.’’ असं पेननं स्पष्ट केलं.

error: