फोटो – ट्विटर

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोजकेच दिवस शिल्लक असल्याचं मान्य केले आहे. 27 ऑक्टोबर 2020 रोजी 34 वर्षाचा झालेल्या वॉर्नरनं आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या विरुद्ध संयमानं वर्तन करणार असल्याचं स्पष्ट केलंय. बॉर्डर-गावस्कर सीरिजचे अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या  ‘सोनी टीव्ही’ शी काही दिवसांपूर्वी बोलताना वॉर्नरनं संयमीपणाचा सूर आळवला आहे.

आक्रमक खेळाडू अशी डेव्हिड वॉर्नरची ओळख आहे. मैदानावरील खेळ असो वा शाब्दिक चकमक दोन्ही ठिकाणी वॉर्नर आघाडीवर असल्याचं क्रिकेटविश्वानं यापूर्वी पाहिलंय. भारताविरुद्धही तो शाब्दिक चकमकीत आघाडीवर होता. आता मात्र वॉर्नरनं या सर्वांपासून दूर राहण्याचं ठरवलंय.

( वाचा : स्मिथला कॅप्टन केले तर टीम चांगला खेळ करेल, ऑस्ट्रेलियाच्या व्हाईस कॅप्टनचं मत )

“मी आता 34 वर्षांचा आहे. त्यामुळे 30 वर्षांच्या खेळाडूच्या तुलनेत माझ्याकडे क्रिकेटसाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे रिस्क जास्त असली तरी आता समंजपणाने क्रिकेट खेळण्याची गरज आहे. मी यापूर्वी शाब्दिक चकमकींचा भाग होतो. त्यांना (भारतीय खेळाडू) देखील अशा प्रकारचा खेळ आवडतो. आता या प्रकराच्या खेळात सहभागी न होण्याचं आम्ही शिकलोय. या प्रकारकाडे दुर्लक्ष करुन बॅटने जास्तीत जास्त रन्स करण्याचा माझा प्रयत्न असेल.” असे वॉर्नरने स्पष्ट केले आहे.

एक वर्षाच्या बंदीवासानंतर परतलेल्या डेव्हिड वॉर्नरसाठी ही दुसरी महत्वाची टेस्ट सीरिज आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये वॉर्नर सपशेल अपयशी ठरला होता. वॉर्नरने इंग्लंड विरुद्ध 5 टेस्टमधील 10 इनिंगमध्ये 9.50 च्या सरासरीने फक्त 95 रन्स केले होते.

भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे सीरिजमनध्ये वॉर्नर जखमी झाला होता. त्यानंतरची T20 सीरिज आणि पहिली टेस्ट वॉर्नर दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये वॉर्नर खेळण्याची शक्यता आहे. वॉर्नरचा ऑस्ट्रेलियात टेस्ट रेकॉर्ड चांगला आहे. तो मेलबर्न टेस्टपासून टीममध्ये सहभागी झाल्यास टीम इंडियाच्या (Team India) डोकेदुखीत वाढ होणार आहे.

बॉर्डर-गावस्कर सीरिजपूर्वी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत वॉर्नरची कामगिरी चांगली झाली. सनरायझर्स हैदाराबाद या टीमचा वॉर्नर कॅप्टन आहे. वॉर्नरनं स्पर्धेत 16 मॅचमध्ये 548 रन्स काढले. वॉर्नरच्या कॅप्टनसीखाली सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.

( वाचा : IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद ‘ते शेवटपर्यंत लढले’ )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: