
टीम इंडियाचा (Team India) ऑल राऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) अनेकांनी वारंवार हेटाळणी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल होताच त्याची थेट कपिल देव (Kapil Dev) यांच्याशी तुलना करण्यात आली. त्यानंतर ‘कॉफी विथ करन’ कार्यक्रमातील सहभागावरुन त्याला अनेकांनी टार्गेट केलं. पांड्या वर्ल्ड कप नंतर दुखापतग्रस्त झाला. त्या दुखापतीचा परिणाम अजूनही असल्याने तो बॉलिंग करत नाही. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील समावेशावर काही पोटदुख्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
हार्दिकचे खेळातून उत्तर
‘उथळ’ असा शिक्का मारण्यात आलेला पांड्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) सीरिजमध्ये त्याच्या खेळातून सर्वांना उत्तर दिले आहे. तीन वन-डेच्या सीरिजमध्ये हार्दिकने टीम इंडियाकडून 105 च्या सरासरीने 210 रन्स काढले. यामध्ये दोन हाफ सेंच्युरींचा समावेश होता. त्याचबरोबर दुसऱ्या वन-डे मध्ये त्याने दुखापतीची पर्वा न करत बॉलिंग केली आणि टीमचे हित हे आपल्यासाठी सर्वात आधी असल्याचे दाखवून दिले.
हार्दिक पांड्याची वन-डे सीरिजमधील कामगिरी
इनिंग | 3 |
नाबाद | 1 |
रन्स | 210 |
सरासरी | 105 |
सर्वोच्च | 92* |
100/50 | 0/2 |
T20 सीरिजमध्येही पांड्याचा धडाका कायम होता. पांड्याने 156 च्या स्ट्राईक रेटने 78 रन्स केले. तीन्ही T20 मध्ये शेवटच्या ओव्हर्समध्ये येऊन वेगाने रन्स करण्याची जबाबदारी होती. दुसऱ्या T20 मधील शेवटच्या ओव्हरमध्ये तर पांड्याने सलग दोन सिक्सर खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. पांड्याच्या आक्रमक खेळामुळेच टीम इंडियाने T20 सीरिज जिंकली आणि तो त्या सीरिजचा ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरला.
( वाचा – IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )
बडे दिलवाला पांड्या!
कोणत्याही सीरिजमध्ये ‘मॅन ऑफ द सीरिज’ हा पुरस्कार मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे ध्येय असते. दुखापतीमुळे परतलेल्या पांड्यासाठी तर हा पुरस्कार आणखी विशेष होता. करियरमधील या मोठ्या क्षणी पांड्याने त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
हार्दिक पांड्याने त्याचा ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार टीम इंडियाचा नवोदित फास्ट बॉलर टी. नटराजनला दिला. पहिलीच आंतरराष्ट्रीय सीरिज खेळणाऱ्या नटराजनच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. नटराजनने दुसऱ्या T20 मध्ये फक्त 20 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्या T20 नंतरही पांड्याने ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारावर खरा हक्क नटराजनचा असल्याचे म्हंटले होते. सीरिज संपल्यानंतर त्याने एक पाऊल पुढे टाकत त्याचा ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार नटराजनला दिला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.