
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) टेस्ट सीरिजमध्ये रवीचंद्रन अश्विन (R. Ashwin) चांगलाच फॉर्मात आहे. अॅडलेड टेस्टमध्ये भारताच्या झालेल्या पराभवात अश्विनची बॉलिंग ही एकमेव सकारात्मक बाब होती. अश्विननं पहिल्या टेस्टमध्ये पाच विकेट्स घेतल्या होत्या. मेलबर्नमध्येही त्याने तो फॉर्म कायम ठेवला आहे. अश्विननं सलग दुसऱ्या टेस्टमध्ये जगातला नंबर 1 बॅट्समन स्टीव्हन स्मिथला (Steven Smith) जाळ्यात अडकवले.
भारताविरुद्ध नेहमीच चांगला खेळ करणारा स्मिथला अॅडलेडमध्ये फक्त 1 रन काढता आला होता. मेलबर्नमध्ये त्याची कामगिरी आणखी घसरली. त्याला खातंही उघडता आलं नाही. अश्विनचा बॉल लेग साईडला खेळण्याच्या नादात स्मिथ फसला. चेतेश्वर पुजारानं कॅच घेण्यात कोणतीही चूक केली नाही. स्मिथ शून्यावर आऊट झाला. स्मिथ आऊट होताच त्याच्या नावावर अनेक रेकॉर्डची नोंद झाली.
( वाचा : ‘स्मिथला या पद्धतीनं आऊट करा’; सचिनचा भारतीय बॉलर्सना सल्ला )
स्मिथच्या नावावर नवे रेकॉर्ड
भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारात पहिल्यांदाच शून्यावर आऊट |
टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये पहिल्यांदाच शून्यावर आऊट |
उजव्या हाताने स्पिन बॉलिंग करणाऱ्या बॉलरकडून तो पहिल्यांदा शून्यावर आऊट |
मेलबर्न (MCG) च्या मैदानावर पहिल्यांदाच शून्यावर आऊट |
2016 नंतर पहिल्यांदाच टेस्टमध्ये शून्यावर आऊट |
स्मिथचा भारताविरुद्ध नेहमीच जबरदस्त रेकॉर्ड राहिला आहे. या टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या वन-डे सीरिजमध्येही त्याने दोन सेंच्युरी झळकावल्या होत्या. टेस्ट सीरिजमध्ये मात्र आतापर्यंत तो अश्विनपुढे टिकू शकलेला नाही. मेलबर्नमध्ये तर तो शून्यावर आऊट झाला. मेलबर्नच्या MCG मैदानावर आणि भारताविरुद्धही तो पहिल्यांदाच शून्यावर आऊट झाला आहे. यापूर्वी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनदा, तर इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध एकदा आऊट झाला होता. विशेष म्हणजे 2016 नंतर पहिल्यांदाच स्मिथ टेस्टमध्ये शून्यावर आऊट झाला आहे. त्याचबरोबर उजव्या हाताने स्पिन बॉलिंग करणाऱ्या बॉलरकडूनही तो पहिल्यांदा शून्यावर आऊट झाला आहे.
( वाचा : IND vs AUS : बॉलर्स हिट तर कॅप्टन सुपर हिट, मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी भारताचा दबदबा )
ऑस्ट्रेलियाला स्मिथचा सहारा!
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ही स्टीव्हन स्मिथवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताविरुद्ध 2018-19 च्या सीरिजमध्ये स्मिथ नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं ती सीरिज गमावली. इंग्लंड विरुद्धच्या 2019 च्या अॅशेस सीरिजमध्ये स्मिथ त्याच्या करियरच्या सर्वोत्तम फॉर्मात होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत करुन अॅशेस सीरिज जिंकली. अॅडलेडमध्ये तो लवकर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाला 200 रन्स करता आले नाहीत. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी दुसऱ्या इनिंगमध्ये कमबॅक करत टीमला टेस्ट जिंकून दिली होती.
आता मेलबर्न टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये स्मिथ शून्यावर आऊट झाला आणि पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला 200 चा टप्पा गाठण्यासाठी पाच रन्स कमी पडले. भारताला बॉर्डर-गावस्कर करंडक (Border-Gavaskar Trophy) आपल्याकडं राखायचा असेल तर मेलबर्नसह उर्वरित सीरिजमध्ये तीनपैकी किमान दोन टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरित सीरिजमध्येही अश्विननं पुन्हा पुन्हा स्मिथला जाळ्यात अडकवणे गरजेचं आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.