
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ब्रिस्बेन टेस्टला (Brisbane Test) सुरुवात झाली आहे. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी त्यांचे नेहमीचे रंग दाखवले आहेत. सिडनीतील सर्व प्रकारानंतरही आपणं काहीही शिकलो नाहीत. पाहुण्या टीमला शिवीगाळ करणे ही ऑस्ट्रेलियन परंपरा ब्रिस्बेनच्या प्रेक्षकांनीही पाळली आहे.
कुणाला झाली शिवीगाळ?
सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी आणि शिवीगाळ झाली होती. या प्रकरणात टीम इंडियाच्या मॅनेजमेंटनं मॅच रेफ्रींकडं तक्रार केली. सिडनी टेस्टच्या चौथ्या दिवशी या शिवीगाळ करणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी मॅच काही काळ थांबवावी लागली. मैदानात पोलिसांना बोलवून हुल्लडबाजांना बाहेर काढावं लागलं होतं. या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) भारतीय टीमची (Team India) माफी मागितली.
( वाचा : IND vs AUS: भारतीय खेळाडूंना सिडनीमध्ये शिवीगाळ, टीम मॅनेजमेंटकडून तक्रार दाखल )
सिडनी टेस्ट संपून अजून आठवडाही झालेला नाही. त्यानंतर तीन दिवसांनी सुरु झालेल्या ब्रिस्बेन टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियन फॅन्सनं शिवराळ परंपरा जपली आहे. त्यांनी पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले. हे दोघेही सीमारेषेच्या जवळ (बाऊंड्री लाईन) फिल्डिंग करत असताना हा प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाच्या ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’ या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.
सिराज बनला अनुभवी बॉलर!
मोहम्मद सिराजची ही तिसरी टेस्ट आहे. त्यानं या सीरिजमध्येच मेलबर्न टेस्टमध्ये पदार्पण केलं आहे. सर्व प्रमुख बॉलर दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे तोच या टेस्टमधील टीम इंडियाचा सर्वात सीनियर बॉलर आहे. त्यानं डेव्हिड वॉर्नरला झटपट आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ब्रिस्बेनप्रमाणे सिडनीमध्येही सिराजनं वॉर्नरला आऊट केलं होतं.
( वाचा : ‘पंचिंग बॅग’ नाही, ‘लढवय्या’ मोहम्मद सिराज! )
सुंदरची पहिलीच टेस्ट
वॉशिंग्टन सुंदरची ही पहिलीच टेस्ट आहे. त्यानं यापूर्वी 1 वन-डे आणि 26 आंतराष्ट्रीय T20 मॅच खेळल्या आहेत. तामिळनाडूकडून (Tamil Nadu) खेळणारा सुंदर देशांतर्गत क्रिकेटमध्ये उपयुक्त बॅट्समन म्हणून ओळखला जातो. त्याला या टेस्ट सीरिजसाठी कव्हर म्हणून थांबवण्यात आलं होतं. जडेजा आणि अश्विन हे दोन्ही प्रमुख स्पिनर जखमी झाल्यानं त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. भारताचा वरीष्ठ बॉलर आर. अश्विननं टेस्ट कॅप देत त्याचं स्वागत केलं. सुंदरनं अश्विनप्रमाणेच स्टीव्ह स्मिथला बॉलिंग करत आऊट केलं.
सिडनी टेस्टमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर टीम इंडियानं जिद्दीनं खेळ करत ती मॅच ड्रॉ केली होती. आता ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या दिवशीही तोच प्रकार घडला आहे. या शिवीगाळीला मैदानात चोख कामगिरी करुन उत्तर देण्याची संधी टीम इंडियाला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.