फोटो – ट्विटर/@ImRitika45

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या टेस्टला ब्रिस्बेनमध्ये (Brisbane Test) सुरुवात झाली आहे. चार टेस्ट मॅचची ही प्रतिष्ठेची सीरिज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आता शेवटच्या टेस्टमध्येच या सीरिजचा फैसला होणार आहे. या निर्णयाक टेस्टमध्ये दोन्ही टीमनं आपली बेस्ट 11 खेळवणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियानं तशी टीम उतरवली देखील आहे. टीम इंडिया (Team India) त्याबाबतीमध्ये दुर्दैवी ठरली.

भारतीय टीमचा या संपूर्ण मालिकेत दुखापतींनी पाठलाग केल. ब्रिस्बेनमध्ये त्याचा कळस झाला. सिडनी टेस्टमध्ये खेळणाऱ्या रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह या चार जणांना चांगल्या कामगिरीनंतरही या टेस्टमधून वगळण्याची वेळ टीम इंडियावर आली.

भारतानं टेस्टमध्ये टी. नटराजन (T. Natarajan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या दोघांना पदार्पण करण्याची संधी दिली. तर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांचाही त्यांना टीममध्ये समावेश करावा लागला.

( वाचा : ‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य! )

1046 विरुद्ध 13!

दोन टेस्टपूर्वी मेलबर्नमध्ये पदार्पण करणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा भारतीय टीममधील सर्वात अनुभवी बॉलर आहे. सिराजची ही तिसरी टेस्ट आहे. तर त्यानंतरचे अनुभवी बॉलर हे शार्दुल आणि सैनी असून या दोघांचीही ही दुसरी टेस्ट आहे. सुंदर आणि नटराजन हे ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदाच टेस्टमध्ये खेळत आहेत. या टेस्टमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमनं टेस्टमध्ये एकूण 1046 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारतीय टीमच्या नावावर फक्त 13 विकेट्स आहेत. ब्रिस्बेन टेस्ट सुरु होण्यापूर्वी या दोन्ही टीमच्या बॉलिंग रेकॉर्डची तुलना करणारा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

भारताच्या नव्या दमाच्या बॉलर्सनी टीमला सुरुवात चांगली करुन दिली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे दोन्ही ओपनर्स झटपट पाठवले. शार्दुल ठाकूरनं तर अगदी पहिल्या बॉलला विकेट घेतली. त्यानंतर सेट झालेल्या स्मिथला वॉशिंग्टन सुंदरनं चकवलं.

सुंदरनं अश्विनप्रमाणेच स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) बॉलिंग केली. सुंदरनं टाकलेल्या 13 बॉलवर स्मिथला एकही रन काढता आला नाही. अखेर तो सुंदरच्याच बॉलिंवर जाळ्यात सापडला. 13 बॉल, शून्य रन आणि 1 विकेट अशी सुंदरची टेस्ट करियरमधील स्मिथ विरुद्धची बॉलिंग आहे. सुंदर यानंतर भारताकडून टेस्ट कधी खेळेत हे सांगता येणार नाही. पण त्यानं भारताची नेहमी डोकेदुखी ठरणाऱ्या स्मिथला पहिल्या इनिंगमध्ये जाळ्यात अडकवलं हा आता रेकॉर्ड झाला आहे.

रहाणे, पुजाराची चूक भोवली

नव्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 आऊट 17 अशी केली होती. ती 4 आऊट 94 झाली असती. स्मिथ आऊट झाल्यानंतर थोड्याच वेळात मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschange) अजिंक्य रहाणेनं जीवदान दिलं. सैनीच्या बॉलिंगवर रहाणेचा लाबुशनेचा कॅच टाकला तेंव्हा तो 37 रनवर खेळत होता. रहाणेनंतर चेतेश्वर पुजारानंही लाबुशेनला 48 वर असताना जीवदान दिलं. तो पुढे 108 रनवर आऊट झाला.

मार्नस लाबुशेननं घरच्या मैदानावर सेंच्युरी झळकावली. ही त्याची टेस्ट क्रिकेटमधील पाचवी सेंच्युरी आहे. ब्रिस्बेन टेस्टमधील पहिल्या तीन इनिंगमध्ये सर्वात जास्त रन करण्याच्या यादीत आता डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांनाही त्यानं मागं टाकलं आहे. लाबुशेनला 40 च्या आता आऊट करुन ऑस्ट्रेलियन टीमवर दडपण आणण्याची संधी टीम इंडियानं गमावली.

लाबुशेनच्या सेंच्युरीमुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 5 आऊट 274 रन्स केले आहेत. भारतीय बॉलर्सकडं अनुभव नाही. सर्वस्वी विषम बॉलिंग अटॅकच्या या लढाईत त्यांनी ऑस्ट्रेलियाला इतक्या रनमध्येच रोखावं ही अपेक्षा करणे चूक आहे. ऑस्ट्रेलिया जितके रन काढेल त्यापेक्षा जास्त रन काढून त्यांच्यावर आघाडी घेणं ही टीम इंडियाच्या बॅट्समनची जबाबदारी असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: