फोटो – ट्विटर/ICC

टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या (Nathan Lyon) बॉलवर विजयी फटका लगावत मॅलबर्न टेस्टमधील विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताच्या आजवरच्या महान टेस्ट विजयामध्ये या विजयाचा समावेश झाला आहे.

कोणत्या परिस्थितीमध्ये मिळवला विजय?

विराट कोहली (Virat Kohli) घरी परतला. रोहित शर्मा (Rohit Sharma) अजून उपलब्ध नाही. इशांत शर्मा आलाच नाही. मोहम्मद शमी शमी दुखापतीमुळे आऊट झाला. उमेश यादव पूर्ण बॉलिंग करु शकला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 36 रन्सची ऐतिहासिक नामुष्की. इतक्या सर्व अडचणी टीम इंडियाला आजवर कधीही कोणत्या विदेशी दौऱ्यात आल्या नव्हत्या. अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) उत्तम कॅप्टनसी आणि त्याला टीममधल्या खेळाडूंनी दिलेली साथ याच्या जोरावर या सर्व अडचणींवर मात करत टीम इंडियानं मेलबर्न टेस्ट जिंकली आहे.

( वाचा : IND vs AUS – ‘हे’ आहेत मेलबर्नमधील टीम इंडियाच्या विजयाचे हिरो! )

2020 या वर्षातला पहिलाच टेस्ट विजय

भारतीय क्रिकेटसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी 2020 हे विचित्र वर्ष ठरलं आहे. संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसनं वेठीस धरलं. त्यामुळे वर्षातला खूप मोठा काळ क्रिकेट बंद होतं. टीम इंडियानं वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या दोन्ही टेस्ट गमावल्या होत्या.

टीममधील बहुतेक खेळाडू हे आयपीएल (IPL ) स्पर्धेतील बायो बबलनंतर (Bio Bubble) थेट ऑस्ट्रेलियात दाखल झाले. त्यानंतर अ‍ॅडलेडमध्ये टीमचा मोठा पराभव झाला. पहिले दोन दिवस टेस्टवर वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये भारतीय टीमनं मॅच गमावली. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) टीम इंडियाला यावर्षात टेस्ट मॅच जिंकण्याची शेवटची संधी होती. अजिंक्य रहाणेच्या टीमनं ती संधी सोडली नाही.

( वाचा : ‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’ )

‘स्मिथ-वॉर्नर नव्हते’ हे रडगाणं बंद केलं

भारतानं ऑस्ट्रेलियातील मागील दौऱ्यात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकली होती. हा विषय निघाला की अनेक मंडळी ‘…पण त्या दौऱ्यात स्मिथ (Steve Smith) आणि वॉर्नर (David Warner) नव्हते, हे रडगाणं गातात.’ या टेस्टमध्येही वॉर्नर नव्हता, पण तो असता तरी फार फरक पडला नसता असं स्मिथची दोन्ही इनिंगमध्ये झालेली अवस्था पाहून सांगता येऊ शकते. स्मिथनं चार इनिंगमध्ये मिळून फक्त 10 रन्स केले आहेत. टेस्ट सीरिजमध्ये धोकादायक दिसणारा स्मिथ पहिल्या दोन टेस्टमध्ये फेल गेला. भारतीय बॉलर्सनी केलेल्या योग्य होमवर्कचे हे यश आहे.

( वाचा : IND vs AUS : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद )

सीरिजवर होणार परिणाम?

विराट कोहली एक टेस्ट खेळून परत जाणार हे समजल्यानंतर ही सीरिज ऑस्ट्रेलिया जिंकणार असाच बहुतेकांनी अंदाज व्यक्त केला होता. अ‍ॅडलेडमधील पराभवानंतर तर ऑस्ट्रेलिया 4-0 नं सीरिज जिंकेल असं बोलणाऱ्या माजी खेळाडूंचा आवाज टिपेला पोहचला होता. आता हे आवाज बंद झाले आहेत.

कोलकातामध्ये 2001 साली भारतानं ‘फॉलो ऑन’ मिळाल्यानंतर आधी टेस्ट आणि नंतर पिछाडीवरुन सीरिज जिंकली होती. मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितही आपण सीरिज जिंकू शकतो हा आत्मविश्वास मेलबर्नवरील विजयानं टीमला दिला आहे. आपण ही सीरिज जिंकल्यास तो 2021 मधील अविस्मरणीय प्रसंग असेल.

( वाचा : अजिंक्य रहाणेच्या अविस्मरणीय सेंच्युरीवर जळणाऱ्या ब्रिटीश मीडियाला वासिम जाफरने दिलं खणखणीत उत्तर! )

2021 मधील नव्या उंचीचा पाया देखील या वर्षीच्या शेवटी मेलबर्नमध्ये टीम इंडियानं मिळवलेल्या विजयात रचण्यात आला आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: