फोटो – ट्विटर/ICC

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) सुरु असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 191 रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि आर. अश्विन या चारही बॉलर्सनी भेदक मारा केल्यानं ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोअर करता आला नाही.

पहिल्यांदाच नामुष्की

ऑस्ट्रेलियाच्या नावावर अ‍ॅडलेड टेस्टमध्ये पहिल्यांदाच एक नामुश्की ओढावली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये (Pink Ball Test) पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेण्यात ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच अपयश आले. ऑस्ट्रेलियानं यापूर्वी सात डे-नाईट टेस्ट खेळल्या आहेत. ही त्यांची आठवी टेस्ट आहे. आठव्या टेस्टमध्ये पहिल्यांदाच त्यांना पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेण्यात अपयश आले.

( वाचा : IND vs AUS : टीम इंडियाला मार्गशीर्षमध्ये ‘अश्विन’ पावला, भारताकडं दुसऱ्या दिवसाखेर 62 रन्सची आघाडी )

ऑस्ट्रेलियन टीम तब्बल एक वर्षांनी टेस्टमध्ये 200 रन्सच्या आत ऑल आऊट झाली. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स (Leeds) टेस्टमध्ये 22 ऑगस्ट 2019 रोजी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 179 रन्स काढले होते. शेवटपर्यंत चुरशीनं झालेली ती टेस्ट ऑस्ट्रेलियानं एक विकेट्सनं गमावली होती.

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन टीम चार वर्षांनी 200 च्या आत ऑल आऊट झाली आहे. यापूर्वी 2016 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होबार्टमध्ये (Hobart) झालेल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीम 85 रन्सवर ऑल आऊट झाली होती. ऑस्ट्रेलियाचा त्या मॅचमध्ये 1 इनिंग आणि 80 रन्सनं दणदणीत पराभव झाला होता.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

ऑस्ट्रेलियन टीम आजवर 67 टेस्टमध्ये 200 पेक्षा कमी रन्सवर ऑल आऊट झाली आहे. यापैकी 38 टेस्ट ते पराभूत झाले असून 23 टेस्टमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. उर्वरित 16 टेस्ट ड्रॉ झाल्या. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन टीम यंदा चौथ्यांदा 200 च्या आत गुंडाळली गेली आहे. यापूर्वीच्या दोन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीम पराभूत झाली होती. तर, सिडनीमध्ये 1947 साली झालेली टेस्ट ड्रॉ संपली होती.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: