फोटो – ट्विटर

‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’. हे चावून चोथा झालेलं वाक्य खोटं ठरवण्याचं काम सर्व देशाचे खेळाडू आणि प्रेक्षक करत असतात. क्रिकेट खेळणारा कोणताही देश त्याला अपवाद नाही. भारतीय टीम (Team India) सध्या ज्या देशाच्या दौऱ्यावर आहे. तो ऑस्ट्रेलिया देश आणि त्याचे खेळाडू यामध्ये तर नेहमी आघाडीवर असतात.

मैदानात स्लेजिंग करणे, मॅच जिंकण्यासाठी बॉल कुरतडणे, प्रतिस्पर्धी टीम्सच्या प्रमुख खेळाडूंना टार्गेट करणे, त्यांच्यावर ‘मंकी गेट’ चा आरोप करणे हे सर्व प्रकार ऑस्ट्रेलियात वारंवार घडले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) उदयानंतर ऑस्ट्रेलियन टीम भारतामध्ये नियमित येऊ लागले. त्यांचा भारतीय खेळाडूंशी संपर्क वाढला. त्यामुळे ही कटूता थोडी कमी झालेली आहे, पण पूर्णपणे संपलेली नाही. सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिजमध्ये याचा अनुभव आलेला आहे.

( वाचा : काय आहे भारत-ऑस्ट्रेलियातील सर्वात वादग्रस्त ‘मंकीगेट’ प्रकरण? )

सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) भारतीय खेळाडूंना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली तसंच त्यांना शिवीगाळ देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत टीम मॅनेजमेंटनं मॅच रेफ्री डेव्हिड बून यांच्याकडं तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

टीम इंडिया दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी फिल्ड़िंग करत असताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)  या दोघांना सिडनीतील प्रेक्षकांनी शिवीगाळ केली. त्याचबरोबर त्यांना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी देखील केली.

( वाचा : पुन्हा ‘मंकीगेटचा’ प्रयत्न? आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलेल्या पाचही खेळाडूंना पाठिंबा देण्याचा BCCI चा निर्णय )

या प्रकरणात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा सिराज, बुमराह आणि टीम इंडियाच्या अधिकाऱ्या ICC तसंच स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं या प्रकरणाची माहिती मैदानावरील अंपायर्सना दिली आहे. त्यानंतर टीम मॅनेजमेंटनं मॅच रेफ्री डेव्हीड बून यांच्याकडं या प्रकरणाची रितसर तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: