
मुंबईचे क्रिकेटपटू ज्या टिपीकल ‘खडूस’ खेळासाठी जगभर ओळखले जातात तो खडूस खेळ कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी जगाला दाखवला. रहाणेनं मेलबर्न टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2020-21 (Border-Gavaskar Trophy, 2020-21) मधील ही पहिलीच टेस्ट सेंच्युरी आहे. रहाणेच्या या सेंच्युरीमुळे टीम इंडियानं दुसऱ्या दिवसखेर 82 रन्सची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’ बनवण्यात कॅप्टन रहाणेच्या सेंच्युरीचा मोठा वाटा आहे.
रहाणे काय-करु शकतो…
मेलबर्न टेस्ट सुरु होण्यापूर्वी सर्व फोकस रहाणेवर होता. पहिल्या टेस्टमधील लज्जास्पद पराभवाचा धक्का ताजा होता. त्या टेस्टमध्ये विराट कोहलीला रन आऊट करण्यात रहाणेची चूक कारणीभूत ठरली होती. रहाणेची ‘ती’ चूक सर्वांच्याच डोळ्यात रुतलेली होती. त्यातच विराट कोहलीचा कॅप्टन म्हणूनच नाही तर निव्वळ बॅट्समन म्हणून असेलेला भक्कम आधार राहाणेकडं नव्हता. पहिल्यी पसंतीचे दोन फास्ट बॉलर जखमी, एका ओपनर अजिबात फॉर्ममध्ये नाही. संपूर्ण टीम 36 च्या धक्क्यात होती.
( वाचा : IND vs AUS : अॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या चुकीचा ऑस्ट्रेलियाला फायदा )
अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट करियरसाठीही गेली काही वर्ष चांगली गेली नव्हती. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये त्याने टीमच्या विजयात निर्णायक ठरलेले 48 रन्स काढले होते. त्यानंतर आठवणीत रहावी अशी इनिंग त्याच्याकडे नव्हती. मागील दोन वर्षात अॅडलेड आणि ट्रेंट ब्रिजमध्ये जिंकलेल्या टेस्टमध्ये त्याचं योगदान होतं. मात्र हे योगदान अपेक्षाभंगाच्या ओझ्यात दबले गेले होते. यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधील त्याची इनिंग तर 1990 च्या दशकातील टीम इंडियाच्या (Team India) लोअर ऑर्डर बॅट्समनची आठवण करुन देणारी होती.
या सर्व कारणामुळे ‘कॅप्टन रहाणे मॅलबर्नमध्ये काय करणार?’ अशी चर्चा या टेस्टपूर्वी सुरु होती. ती चर्चा ‘कॅप्टन रहाणे काय काय करु शकतो’, या वाक्यात आता बदलली आहे. रहाणे बॅटिंगला आला तेंव्हा शांतपणे खेळण्याची गरज होती. त्याने हनुमा विहारीसोबत पार्टनरशिप करताना भक्कम बचावावर भर दिला.
( वाचा : IND vs AUS : बॉलर्स हिट तर कॅप्टन सुपर हिट, मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी भारताचा दबदबा )
पहिला आशियाई बॅट्समन
हनुमा विहारीसोबत शांततपणे खेळणारा रहाणे ऋषभ पंत येताच अधिक मोकळा झाला. आता टीमसाठी परिस्थिती बदलत आहे याची ती नांदी होती. पंत 29 रन्सची छोटी पण परिणामकारक खेळी करुन गेला. त्यानंतर रवींद्र जडेजासोबत रहाणेनं उर्वरित दिवस खेळून काढला. त्यांच्या पार्टरनरशिपमध्ये दोनदा पावसाचा अडथळा आला, पण एकही ऑस्ट्रेलियन बॉलर अडथळा आणू शकला नाही.
ऑस्ट्रेलियात ‘बॉक्सिंग डे टेस्ट’मध्ये दोन सेंच्युरी करणारा रहाणे हा एकमेव आशियाई बॅट्समन आहे. यापूर्वी त्यानं 2014 साली या मैदानावर सेंच्युरी झळकावली होती. रहाणेची ती सेंच्युरी म्हणजे हाय-वे वर गाडी चालवण्यासारखी होती. ही सेंच्युरी नुकत्याच झालेल्या वादळामध्ये संपूर्ण उखडलेल्या रस्त्यावर गाडी चालवणे होते. या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या गाडीचं चाक योग्य ड्रायव्हरच्या हातामध्ये आहे, हा विश्वास रहाणेनं मेलबर्न टेस्टच्या दोन दिवसात दिला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.