फोटो – ट्विटर /ICC

एखादी व्यक्ती सर्वोच्च अधिकार मिळाल्यावर जसं वागते तसा त्याचा मुळ स्वभाव असतो. खुनशी प्रवृत्तीचे लोकं सर्वसात्ताधीश झाले तर ते त्यांच्या स्वभावामुळे सर्व यंत्रणा वेठीस धरतात. खंबीर स्वभवाचा माणूस अधिकारपदावर पोहचला तर तो त्याच्या अधिकार क्षेत्रातही स्वत:चा खोल ठसा उमटवतो. वैयक्तिक आयुष्यातील सत्तेसारखीच क्रिकेटमधील सत्ता म्हणजे टीमची कॅप्टनसी असते.

एखादा खेळाडू कॅप्टन झाल्यावर कसा खेळतो, तो कसा वागतो, सहकाऱ्यांना कसं वागवतो याचे त्याच्या आयुष्यभर पडसाद उमटतात. सौरव गांगुली (Sourav Ganguly) रिटायर होऊन आता एक दशक उलटलं तरी आजही त्याच्या कॅप्टनसीबद्दल त्याचे सर्व सहकारी आदरानं बोलतात. महेंद्रसिंह धोनी किंवा क्रिकेटमधल्या कोणत्याही महान कॅप्टनला देखील हाच नियम लागू होतो.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारताचा काळजीवाहू कॅप्टन आहे. विराट कोहली (Virat Kohli)  कौटुंबीक कारणामुळे भारतात परतल्याने उर्वरित तीन टेस्टसाठी तो कॅप्टनसी करत आहे. मेलबर्न टेस्टच्या पहिल्या दिवसावर भारतानं (Team India) वर्चस्व गाजवलं. भारतीय बॉलर्सच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची टीम 195 रन्सवर ऑल आऊट झाली. या इनिंगमध्ये रहाणेची कॅप्टनसी आणि फिल्डिंग प्लेसमेंट ही सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली. त्याने कोणताही दबावात न येता सकारात्मक कॅप्टनसी केली आणि ऑस्ट्रेलियाला 200 च्या आत रोखण्यासाठी बॉलिंगमध्ये योग्य बदल केले.

( वाचा : IND vs AUS : बॉलर्स हिट तर कॅप्टन सुपर हिट, मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी भारताचा दबदबा )

अजिंक्यनं जिंकली मनं

अजिंक्यनं सुरुवातीच्या सेशनमध्ये आर. अश्विनचा वापर केला. अश्विनने स्मिथला आऊट करत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये अजिंक्यनं मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) हातामध्ये बॉल दिला. सिराजची ही पहिलीच टेस्ट आहे. सिराज या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल होताच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. तरीही सिराजनं कर्तव्याला प्राधान्य देत घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता.

फोटो सोशल मीडिया

सिराजनं दुसऱ्या सेशनमध्ये चांगली बॉलिंग करत मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) 48 रन्सवर आऊट केलं. योगायोगाची गोष्ट म्हणजे सिराजप्रमाणचे पहिली टेस्ट खेळणाऱ्या शुभमन गिलनं लाबुशेनचा चांगला कॅच घेत या विकेटमध्ये वाटा उचलला होता. अजिंक्यनं दुसरे सेशन संपल्यानंतर टी टाईमसाठी ड्रेसिंग रुममध्ये जाताना पदार्पणवीर सिराजला टीमला लीड करण्याचा मान दिला. सिराज टीमला लीड करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

( वाचा : फक्त एका रुपयात मिळणार भरपेट जेवण, भारताच्या माजी क्रिकेटपटूने सुरु केली ‘जन रसोई’ )

अजिंक्यनं यापूर्वीही केली होती कृती

फोटो – सोशल मीडिया

अजिंक्यनं यापूर्वीही बंगळुरुमध्ये 2018 साली  अफगाणिस्तान विरुद्धची एक टेस्टची सीरिज जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या टीमला ट्रॉफी स्विकारल्यानंतर एकत्र फोटो काढण्यासाठी बोलावले होते. देशातील अशांत परिस्थितीशी रोज झगडत असलेल्या अफगाणिस्तानच्या टीमनं बंगळुरुमध्ये आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. त्यांच्या या लढाऊ वृत्तीला सलाम करण्यासाठी अजिंक्यनं अफगाणिस्तानच्या टीमला तो सन्मान दिला होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: