फोटो – ट्विटर /ANI

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test)  तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) उर्वरित सीरिजमधून आऊट झाला आहे. मिचेल स्टार्कचा (Mitchell Strarc) बॉल जडेजाच्या डाव्या अंगठ्याला लागला होता. या दुखापतींमुळे तो सहा आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. ANI नं ही बातमी दिली आहे.

जडेजाची कमी जाणवणार

रवींद्र जडेजा हा या सिझनमध्ये फॉर्मात असलेला खेळाडू होता. आयपीएल स्पर्धा (IPL 2020) आणि भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (India tour of Australia) दोन्ही ठिकाणी त्यानं चांगल्या खेळातून छाप उमटवली होती. सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यानं चार विकेट्स घेतल्या आणि एक भन्नाट थ्रो करुन स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) रन आऊट केलं. भारताच्या पहिल्या इनिंगमध्येही त्यानं नाबाद 28 रन्सची खेळी केली होती. आता जडेजा या सीरिजमधून निर्णायक क्षणी आऊट झाल्यानं बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात टीम इंडियाला त्याची कमतरता जाणवणार आहे.

( वाचा : IND vs AUS: चिते की चाल, बाज़ की नजर और जडेजा का थ्रो… पाहा VIDEO )

यापूर्वीही झाला होता जखमी

रवींद्र जडेजा या सीरिजमध्ये दुसऱ्यांदा जखमी झाला आहे. यापूर्वी कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या T20 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कचा बॉल हेल्मेटला लागल्यानं जडेजा  दोन T20 आणि पहिली टेस्ट खेळू शकला नव्हता. त्यानंतर मेलबर्न टेस्टमध्ये विराट कोहलीच्या जागी त्याची निवड करण्यात आली होती.

जडेजाच्या जागी कोण?

रविंद्र जडेजा दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगला येणार नसल्यानं त्याचा टीमला मोठा फटका बसणार आहे. त्याच्या जागेवर दुसरा कोणता खेळाडू चौथ्या दिवशी खेळणार का? हे स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर ब्रिस्बेन टेस्टमध्ये त्याच्या जागी कुणाला खेळवणार? हा प्रश्न देखील टीमसमोर असेल.

( वाचा : IND vs AUS: स्मिथच्या सेंच्युरीनंतर जडेजा आणि गिलमुळे टीम इंडियाचं कमबॅक! )

ब्रिस्बेनचं पिच फास्ट बॉलर्सला मदत करणारं आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूर किंवा टी. नटराजन हे दोन पर्याय टीम मॅनेजमेंटसमोर आहेत. टीमनं बॅटिंग मजबूत करण्याचं ठरवलं तर मयंक अग्रवालची निवड होऊ शकते. तर स्पिनर म्हणून कुलदीप यादव हा पर्याय टीम मॅनेजमेंटसमोर आहे. त्याचबरोबर जडेजाच्या जागी टेस्ट सीरिजसाठी थांबवून ठेवलेल्या वॉशिंग्टन सुंदरचाही विचार होऊ शकतो. सुंदर स्पिनर असून त्यानं तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये उपयुक्त बॅटिंग देखील केली आहे.

ऋषभ पंत देखील जखमी

टीम इंडियाची बॅटिंग सुरु असताना विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) देखील जखमी झाला. पंतच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो नंतर फिल्डिंगसाठी उतरला नाही. पंतच्या जागी वृद्धीमान साहानं तिसऱ्या दिवशी विकेट किपिंग केली. मात्र पंतची दुखापत गंभीर नसून तो दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुखापतीचं ग्रहण

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. ही सीरिज सुरु होण्यापूर्वी IPL मध्ये भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा जखमी झाले. त्यानंतर रोहित शर्मा बराच काळ बाहेर होता. टेस्ट सीरिज सुरु झाल्यापासून मोहम्मद शमी, उमेश यादव आणि के.एल. राहुल हे खेळाडू देखील दुखापतीमुळे मायदेशी परतले आहेत.

( वाचा : लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, मोहम्मद शमी टेस्ट सीरिजमधून आऊट )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: