फोटो – ट्विटर / @Steve Smith49

स्टीव्हन स्मिथ (Steve Smith) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागल्यापासून भारताच्या राशीला बसला आहे. टेस्ट आणि वन-डे या दोन्ही फॉरमॅटमध्ये स्मिथची बॅट टीम इंडिया (Team India) विरुद्ध हमखास चालते. मागील वर्षी त्यानं भारताविरुद्ध वन-डेमध्ये सलग तीन सेंच्युरी झळकावल्या होत्या. त्याचबरोबर ही सीरिज सुरु होण्यापूर्वी त्याची भारताविरुद्धचा टेस्टमधील सरासरी 84.05 इतकी जबरदस्त होती.

(वाचा : आकडे बोलतात; भारताच्या विजयात स्टीव्हन स्मिथ ठरणार मोठा अडसर! )

या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टमध्ये स्मिथची बॅट काही चालली नाही. त्याला पहिल्या दोन टेस्टमध्ये फक्त 10 रन करता आले होते. स्मिथच्या अपयशाचा ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण बॅटिंगवरही परिणाम झाला. त्यांना पहिल्या दोन टेस्टमध्ये एकदाही 200 पेक्षा जास्त रन करता आले नाहीत. दबावात असलेल्या स्मिथनं 2021 ची सुरुवात चांगली केली आहे. त्यानं सिडनीमध्ये 131 रन्सची खेळी केली. याचबरोबर स्मिथनं अनेक विक्रमांची नोंदही केली आहे.

स्मिथ आणि विराट!

स्मिथची टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीशी नेहमी तुलना होते. या खेळीच्या दरम्यान स्मिथनं विराटची एकामध्ये बरोबरी केली तर एकामध्ये त्याला मागं टाकलं. स्मिथनं विराटच्या 27 टेस्ट सेंच्युरीची बरोबरी केली आहे. तर टेस्ट क्रिकेटमधील विराटनं आजवर काढलेल्या 7318 रन्सला मागं टाकलं आहे. विराटनं हे रन्स करण्यासाठी 147 इनिंग लागल्या. स्मिथनं 136 इनिंगमध्ये त्याला मागं टाकलं आहे.

स्मिथ आणि कोहली यांची टेस्टमधील कामगिरी

इनिंगरन्ससेंच्युरी
स्टीव्हन स्मिथ136736827
विराट कोहली147731827

भारताची डोकेदुखी!

स्मिथची ही भारताविरुद्धची 25 व्या इनिंगमधील आठवी टेस्ट सेंच्युरी आहे. त्याच्या 27 व्या सेंच्युरीपैकी 29.6 टक्के सेंच्युरी या भारताविरुद्ध आहेत. भारताविरुद्ध आठ टेस्ट सेंच्युरी करणाऱ्या गॅरी सोबर्स, व्हिव्ह रिचर्च आणि रिकी पॉन्टिंग याची त्यानं बरोबरी केली आहे. मात्र स्मिथनं या तिन्ही दिग्गजांपेक्षा कमी इनिंगमध्ये ही कामगिरी केली आहे.

भारताविरुद्ध टेस्टमध्ये सेंच्युरी

इनिंगसेंच्युरी
स्टीव्हन स्मिथ258
गॅरी सोबर्स308
व्हिव्ह रिचर्ड418
रिकी पॉन्टिंग518

स्मिथचे अन्य रेकॉर्ड्स

डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्या नंतर 27 टेस्ट सेंच्युरी पूर्ण करणारा स्मिथ हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. भारताविरुद्ध टेस्टमध्ये 1500 रन्सचा टप्पाही स्मिथनं पार केला. त्याचबरोबर त्याचा टीममधील सहकारी डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) 7,249 रन्सलाही स्मिथनं मागं टाकलं.

स्मिथ कसा झाला यशस्वी?

पहिल्या दोन टेस्टमध्ये फेल गेलेला स्मिथ सिडनीमध्ये कसा यशस्वी झाला? याचं उत्तर त्यानं स्वत:  दिलं आहे. “मी सुरुवातीपासून सकारात्मक खेळ करायचा ठरवला. अश्विनच्या बॉलिंगवर त्याच्या डोक्यावरुन फटके लगावले. अश्विनला मला हवी त्या टप्प्यावर बॉलिंग करायला लावण्यात यशस्वी ठरलो. फास्ट बॉलर्सपेक्षा स्पिन बॉलिंग खेळताना पायांची हलचाल अधिक केली,” असं स्मिथनं सांगितलं.

( वाचा : IND vs AUS : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद )

स्मिथनं नव्या वर्षाची सुरुवात सेंच्युरीनं केली आहे. सूर (फॉर्म) गवसलेल्या स्मिथला रोखण्यासाठी भारतीय बॉलर्सना अधिक गृहपाठ करावा लागणार आहे.

*लेखातील आकडेवारी ही दिनांक 8/1/2021 पर्यंतची आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: