फोटो – ट्विटर / BCCI

मेलबर्नमधील पराभवानंतर (MCG Test) रोज नवे गोंधळ घालणाऱ्या ऑस्ट्रेलियन मनोवृत्तीला मैदानात उत्तर देण्यासाठी टीम इंडिया 309 रन दूर आहे. हे टार्गेट अवघड आहे. आजवर खूप कमी जणांना हे जमलं आहे. पण, आर. अश्विन (R. Ashwin) चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर म्हणाला तसं, ‘’कठीण परिस्थितीमध्येच टीम एकत्र येत असते.’’ कोलकातामध्ये 2001 साली झालेल्या टेस्टमध्ये टीम कशी एकत्र खेळली, त्यांच्यापासून प्रेरणा घेत या टीममधील खेळाडू घडले आहेत. आता सोमवारी सिडनीमध्ये मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) ‘ब्राऊन डॉग’ असं बोलणाऱ्या वर्णद्वेषी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांसमोर एक इतिहास घडवण्याची संधी ज्याचं नाव ‘अजिंक्य रहाणे’ आहे त्या कॅप्टनच्या टीमला आहे.

( वाचा : IND vs AUS: भारतीय खेळाडूंना सिडनीमध्ये शिवीगाळ, टीम मॅनेजमेंटकडून तक्रार दाखल )

टार्गेट का झालं अवघड?

ऑस्ट्रेलियानं त्यांची दुसरी इनिंग 6 आऊट 312 रन्सवर घोषित केली आणि भारतासमोर (Team India) 407 रन्सचं आव्हानात्मक टार्गेट ठेवलं. हे टार्गेट किमान 100 रननी वाढवण्यात टीम इंडियाच जबाबदार आहे. पहिल्या इनिंगमध्ये तीन भारतीय बॅट्समन रन आऊट झाले. टेस्ट क्रिकेटच्या तिसऱ्या दिवशी अगदी ‘य’ ओव्हर्स शिल्लक असताना रन आऊट होणं हा अपराध आहे. तो अपराध भारतीय टीमनं तीनदा केला.

दुसऱ्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) विना उतरलेल्या भारतीय बॉलर्सनी जीवतोडून मारा केला. ऑस्ट्रेलियाचे ओपनर लवकर पाठवले. पण चौथ्या दिवसाच्या अगदी दुसऱ्या बॉलवर मार्नस लाबुशेनचा (Marnus Labuschange) सोपा कॅच हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) सोडला.  त्यावेळी लाबुशेन 47 रनवर खेळत होता. पुढं तो स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)  सोबत 103 रन्सची पार्टरनरशिप करुन 73 रनवर आऊट झाला.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे, म्हणून टीमममध्ये असलेल्या टीम पेनला 7 रनवर रोहित शर्मानं (Rohit Sharma) जीवदान दिलं. पेननं नाबाद 39 रन काढले. त्याचबरोबर कॅमेरुन ग्रीन सोबत सहाव्या विकेटसाठी 104 रन्सची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाची अधिकृत खालच्या क्रमांकाचे बॅट्समन ( लोअर ऑर्डर बॅट्समन) बॅटिंगला येऊ दिले नाहीत.

( वाचा : IND vs AUS अ‍ॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाची खराब फिल्डिंग, ‘यांनी’ सोडल्या कॅच )

भारताची आश्वासक सुरुवात

407 रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियानं आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मानं शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) 71 रन्सची भागिदारी केली. रोहितनं ओपनर म्हणून विदेशी मैदानावरील पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. गिलनंही चांगली सुरुवात करत मोठ्या खेळीचं  स्वप्न दाखवलं. गिलला हेजलवुडनं 31 रनवर आऊट केलं. तर वीरेंद्र सेहवागच्या 2009 चेन्नई टेस्टची आठवण करुन देणारा रोहित 52 रनवर आऊट झाला.

रोहित दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात आऊट झाल्यानं ऑस्ट्रेलियानं मोठा निश्वास सोडला आहे. आता चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी या एकाच पद्धतीनं खेळणाऱ्या टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समनवर ही मॅच वाचवण्याची जबाबदारी आहे. पाचव्या दिवशी टीम इंडियाला गमवण्यासारखं काही नाही. रहाणे-पुजाराची मोठी पार्टरनरशिप आणि अन्य बॅट्समनं चुका टाळत खेळण्याचा इंटेट दाखवला तर ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंग होऊ शकतं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: