
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्या मेलबर्नमध्ये (Melbourne) दुसरी टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) सेंच्युरी झळकावली. ज्यांनी क्रिकेट बघण्यास नुकतीच सुरुवात केली आहे, अशा लहान मुलांपासून ते ज्यांना दुर्दैवानं कमी दिसतं किंवा काही कारणांमुळे दिसत नाही, पण क्रिकेटमध्ये काय सुरु आहे, याकडं त्यांचे कान आहेत अशा सर्वांनी रहाणेच्या या अविस्मरणीय सेंच्युरीचं कौतुक केलं आहे.
रहाणेच्या या सेंच्युरीमुळे काहींना पोटदुखीही झालीय. भारतीयांनी चांगली कामगिरी केली की ज्यांना सर्वात प्रथम पोटदुखी होते त्यात ब्रिटीशांचा आघाडीचा क्रमांक आहे. ब्रिटीशांना त्यांच्या देशाबाहेर कुठेही चांगलं काही झालेलं पाहवत नाही. 1986 च्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दिएगो मॅराडोनाला रेफ्रीच्या चुकीमुळे गोल देण्यात आला. त्या ‘हँड ऑफ गॉड’ बद्दल ब्रिटीश आजही रडतात. अगदी मॅराडोनाचा मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटातच मॅराडोनानं त्यावेळी कशी चिटींग केली होती, ही चर्चा स्वत:वर सुसंस्कृतपणाचा शिक्का मारणाऱ्या ब्रिटीशांनी सुरु केली होती.
( वाचा : शोएब अख्तरचे ‘गझवा-ए-हिंद’ के जहरीले सपने, ‘काश्मीर ताब्यात घेऊ, भारतावर हल्ला करु’ – पाहा VIDEO )
आता अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीबद्दल त्यांना त्याचं कौतुक करता आलं नाही. ‘टेलिग्राफ’ (Telgraph) या ब्रिटीश वेबसाईटनं त्याची अशी हेडलाईन केली.
आता वास्तविक कॅच सुटणे हा क्रिकेटचा भाग आहे. खेळताना कॅच सुटतात म्हणूनच जो कॅच पकडतो त्याला महत्त्व आहे. मैदानात आल्यावर लगेच शून्यावर आऊट होण्याचा धोका असतो म्हणून पहिला रन लवकर काढण्याचा सर्व जण प्रयत्न करतात. प्रत्येकाला प्रत्येक मॅचमध्ये सेंच्युरी करता येत नाही म्हणून सेंच्युरी करणाऱ्या खेळाडूला मान आहे. प्रत्येक जण कॅच पकडू लागला, एक रन पासून बॅट्समनची इनिंग सुरु झाली आणि तो कधीही शंभरच्या आत आऊट झाला नाही तर क्रिकेट हा व्हिडीओ गेम होईल. यशाबरोबरच अपयश, चुकलेल्या संधी या देखील खेळाचा भाग आहेत.
टेलिग्राफला मात्र भारतीय अजिंक्यची सेंच्युरी बघवली नाही. त्यांनी त्याचं खुसपट काढत हेडलाईन केली. त्याची सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांनी इंग्लंडने ICC च्या अजब नियमांचा फायदा घेत इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकला याची आठवण करुन दिली.
इंग्लंडनं चौकारांच्या नियमाच्या आधारे 2019 चा क्रिकेट वर्ल्ड़ कप जिंकला होता. तसंच फायनलमध्ये श्रीलंकन अंपायर कुमार धर्मसेना यांनी नियमाकडे दुर्लक्ष करत इंग्लंडला पाच रन्सचं बक्षीस दिलं होतं. ते बक्षीस मिळालं नसतं तर इंग्लंडच्या टीमनं सुपर ओव्हरपूर्वीच फायनल गमावली असती.
भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर हा त्याच्या खास शैलीतील ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. जाफरनं तात्काळ ब्रिटीशांची ही जळकी वृत्ती पकडली आणि त्यांनी त्यांचंच ट्विट नीट करुन दिले.
जाफरचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच लोकप्रिय झाले आहे. बहुतेकांनी हे खणखणीत उत्तर दिल्याबद्दल जाफरचे आभार मानले आहेत.
(वाचा : वासिम जाफरने अजिंक्य रहाणेला दिलेल्या गूढ संदेशाचा अर्थ माहिती आहे का? )
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.