फोटो – मुंबई मिरर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील अ‍ॅडलेड (Adelaide) टेस्टमध्ये टीम इंडियाची (Team India) दुसरी इनिंग फक्त 36 रन्सवर संपुष्टात आली. टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधील हा निचांकी स्कोअर आहे. या लज्जास्पद कामगिरीतून सावरण्यासाठी भारतीय टीमला बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवाची जखम ताजी असतानाच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

शमीला काय झाले?

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी ( Mohmmed Shami)  दुखापतीमुळे उर्वरित टेस्ट सीरिजमधून आऊट झाला आहे. शमीच्या कोपराला दुखापत झाली असून ती दुखापत गंभीर असल्याची माहिती आहे. अ‍ॅडलेड टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पॅट कमिन्सचा बाऊंसर डावीकडे खेळण्याच्या प्रयत्नात मोहम्मद शमीच्या उजव्या कोपरावर बॉल आदळला. बॉल आदळल्यानं शमी पुढे बॅटिंग करु शकला नाही. त्यामुळे लॉर्ड्सवर 1974 साली नोंदवलेला 42 रन्सचा निचांक पार करण्याची टीम इंडियाची शेवटची आशा संपली. शमीनं नंतर बॉलिंग देखील केली नाही.

( वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’! )

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) मॅच संपल्यानंतर शमीच्या दुखापतीचे अपडेट दिले आहे. “ शमीला हाताची हालचाल करायला त्रास होत आहे. त्याच्या दुखापतीबद्दल सध्या काहीच सांगू शकत नाही. स्कॅन रिपोर्ट आल्यानंतरच त्याबद्दल अधिक माहिती सांगता येईल असं विराटनं स्पष्ट केले होते.

टीम इंडियाला धक्का

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2018-19 साली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. त्या विजयात इशांत-बुमराह-शमी या फास्ट बॉलर्सच्या त्रिकुटाचा मोठा वाटा होता. यापैकी इशांत शर्मा दुखापीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेला नाही. त्यातच आता शमीचे उर्वरित मालिकेत खेळणे अनिश्चित झाल्याने टीम इंडियाला धक्का बसला आहे.

मोहम्मद शमी हा भारताचा अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा बॉलर आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) त्याने जोरदार कामगिरी करत 20 विकेट्स घेतल्या होत्या. अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शमीला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, त्याने सातत्याने चांगली बॉलिंग करत ऑस्ट्रेलियन बॅट्समनवर दबाव निर्माण केला होता.

( वाचा : IND vs AUS अ‍ॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाची खराब फिल्डिंग, ‘यांनी’ सोडल्या कॅच )

आता शमी टेस्ट सीरिजमधून आऊट झाला आहे. त्यामुळे मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी या नवोदीत फास्ट बॉलर्स पैकी एकाचा अंतिम 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: