फोटो – क्रिकेट ऑस्ट्रेलिया

बॉर्डर – गावस्कर (Border – Gavaskar Trophy) ट्रॉफीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया टीममधल्या डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्हन स्मिथ (Steven Smith) यांची सर्वात जास्त चर्चा आहे. स्टार्क-कमिन्स-हेजलवूड-पॅटिन्सन या फास्ट बॉलिंगच्या चौकडीचा भारतीय बॅट्समन कसा सामना करणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या चार बॉलर्सच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या बॉलर्सची चर्चा फार होत नाही. चर्चेच्या रडारपासून दूर असणारा त्या पाचव्या बॉलर्सपासून भारतीय बॅट्समन्सला विशेष सावध राहावे लागणार आहे. कारण, हा ऑस्ट्रेलियाचा पाचवा बॉलर भारताविरुद्ध सर्वात जास्त यशस्वी ठरलाय. चर्चेच्या केंद्रबिंदूपासून दूर राहून काम करणाऱ्या त्या पाचव्या बॉलरचं नाव आहे नॅथन लायन! (Nathan Lyon)

तुमचा विश्वास बसत नसला तरी नॅथन लायन हा भारताविरुद्ध सर्वात जास्त विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा बॉलर आहे.

बॉलरटेस्टविकेट्स
नॅथन लायन1885
ब्रेट ली1253
रिची बेनॉ852
ग्लेन मॅग्रा1151
मिचेल जॉन्सन1450

भारताविरुद्ध यशस्वी ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या यादीत लायन हा दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर ब्रेट ली पेक्षा तब्बल 32 विकेट्सने पुढे आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक यशस्वी बॉलर्सच्या यादीत पहिल्या पाचमध्ये लायनचा समावेश होतो.

बॉलरदेशटेस्टविकेट्स
जेम्स अँडरसनइंग्लंड27110
मुरलीधरनश्रीलंका22105
इम्रान खानपाकिस्तान2394
नॅथन लायनऑस्ट्रेलिया1885
माल्कम मार्शलवेस्ट इंडिज1776

भारताविरुद्ध टेस्टमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत लायन चौथ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील इम्रान खानपेक्षा लायन फक्त 9 विकेट्स दूर आहे. त्याचा भारताविरुद्धचा फॉर्म पाहता तो या सीरिजमध्ये इम्रानला मागे टाकण्याची शक्यता आहे.

टेस्ट मॅचमध्ये एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेणे ही मोठी कामगिरी असते. भारताविरुद्ध ही कामगिरी करणाऱ्या बॉलर्सच्या यादीत जगभरातील दिग्गजांना मागे टाकत लायन पहिल्या क्रमांकावर आहे.

बॉलरदेशटेस्ट्सएका इनिंगमध्ये पाच विकेट्स
नॅथन लायनऑस्ट्रेलिया187
मुरलीधरनश्रीलंका227
इयान बोथमइंग्लंड146
इम्रान खानपाकिस्तान236
माल्कम मार्शलवेस्ट इंडिज176

नॅथन लायन आणि श्रीलंकेचा महान बॉलर मुरलीधरन यांनी भारताविरुद्ध एका इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी प्रत्येकी सात वेळा केलीय. पण, लायनने मुरलीधरनपेक्षा चार टेस्ट कमी खेळत ही कामगिरी केल्याने तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. इयान बोथम, इम्रान खान आणि माल्कम मार्शल हे फास्ट बॉलर्स हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

महेंद्रसिंह धोनीने 2013 च्या चेन्नई टेस्टमध्ये लायनची जोरदार धुलाई केली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन टीममधील स्थान गमावावं लागलं होतं. भारताविरुद्ध मिळालेल्या त्या सेटबॅकनंतर लायनने जोरदार कमबॅक केलं. तो आज भारताविरुद्धचा सर्वाधिक यशस्वी ऑस्ट्रेलियन बॉलर बनलाय.

फोटो : विस्डेन

शेन वॉर्ननंतर 300 टेस्ट विकेट्स घेणारा तो दुसराच ऑस्ट्रेलियन स्पिनर आहे. क्रिकेटच्या मैदानावरील कर्मचारी ते ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी ऑफ स्पिनर असा टप्पा लायनने पार केलाय. दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कामगिरीपुढे त्याचा खेळ अनेकदा लपतो. असे असले तरी लायन त्याचे काम चोख बजावतं. विशेषत: भारताविरुद्ध तो अधिकच धोकादायक बनतो हे त्याचे आकडे सांगतात. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखायची असेल तर भारतीय टीमला लायनला काळजीपूर्वक खेळावं लागणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: