सौजन्य - BCCI

भारतीय क्रिकेट टीमचा 2007-08 चा ऑस्ट्रेलिया दौरा (India tour of Australia) चांगलाच वादग्रस्त ठरला होता. दोन्ही टीममध्ये सिडनीमध्ये (Sydney) झालेली टेस्ट वादाचा परमोच्च बिंदू होती. ऑस्ट्रेलियन टीमचं मैदानारील वर्तन आणि त्याला अंपायर बकनर यांची मिळालेली साथ यामुळे तेंव्हाचा टीम इंडियाचा कॅप्टन अनिल कुंबळे देखील संतापला होता. ‘शांत क्रिकेटपटू’ अशी अनिल कुंबळेची (Anil Kumble) जगाला ओळख आहे. सिडनी टेस्टमधील पक्षपाती घटनांमुळे कुंबळे देखील अस्वस्थ झाला आणि त्याने संयमी शब्दात आपल्या रागाला मोकळी वाट करुन दिली होती.

“फक्त एकच टीम ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ च्या तत्वाने खेळत होती. मला इतकंच सांगायचे आहे.’’ या शब्दात कुंबळेने ऑस्ट्रेलियन टीमच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. “तुम्ही सर्व गोष्टी खिलाडू वृत्तीने स्विरारण्याचा प्रयत्न करता, पण ते स्विकारणे त्रासदायक असते. मॅच जिंकून सीरिज बरोबरीत करण्याची चांगली संधी असताना ते शक्य झाले नाही”, या शब्दात सिडनी टेस्टमधील पराभवानंतर कुंबळेने प्रतिक्रिया दिली होती.

पुन्हा ‘मंकीगेटचा’ प्रयत्न? आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलेल्या पाचही खेळाडूंना पाठिंबा देण्याचा BCCI चा निर्णय

सिडनी टेस्टमधील भारताच्या पराभवाला खराब अंपायरिंग हे मुख्य कारण मानले जाते. अंपायर बकनरने त्या टेस्टमध्ये भारताच्या विरोधात अनेक वादग्रस्त निर्णय दिले. सायमंड्स 31 रन्सवर असताना त्याच्या विरुद्धचे LBW चे जोरदार अपिल बकनर यांनी फेटाळले होते, सायमंड्सने पुढे 162 रन्स केले. त्याचबरोबर राहुल द्रविडच्या पॅडला बॉल लागलेला असतानाही बकनर यांनी द्रविड कॅच आऊट असल्याचा निर्णय दिला होता.

सौरव गांगुलीचा स्लिपमध्ये मायकल क्लार्कने घेतलेला कॅच वैध असल्याचा निर्णय तर आधी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगने दिला होता. त्यानंतर अंपायर मार्क बेन्सननं पॉन्टिंगची री ओढत गांगुलीला आऊट दिले. गांगुली आऊट असल्याचा कोणताही ठोस पुरावा टेलिव्हिजन रिप्लेमध्ये दिसत नव्हता. तरीही अंपायर्सने पक्षपाती निर्णय देत गांगुलीला आऊट दिले होते.

( वाचा : ‘अंपायरमुळे नाही तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उद्दामपणामुळे मैदान सोडलं होतं’, 1981 च्या ‘वॉक आऊट’ चं गावस्करांनी सांगितलं सत्य! )

अंपायर्सच्या पक्षपाती निर्णयामुळे सिडनी टेस्टमध्ये अगदी शेवटच्या सत्रात भारताचा पराभव झाला. हरभजन सिंग – सायमंड्स यांच्यातील गाजलेलं ‘मंकी गेट’ प्रकरण देखील सिडनी टेस्टमध्येच घडले. ज्यामध्ये हरभजनवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. या आरोपातून हरभजनची निर्दोष मुक्तता झाली.

सिडनी टेस्टमध्ये सौरव गांगुलीला अंपायरच्या आधी रिकी पॉन्टिंगने आऊट दिले होते!

काय आहे भारत-ऑस्ट्रेलियातील सर्वात वादग्रस्त ‘मंकीगेट’ प्रकरण?

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: