
टीम इंडियाचा (Team India) विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) आपण काय करु शकतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. पंतसाठी आयपीएल (IPL2020) स्पर्धा निराशाजनक गेली होती. त्याचं वजन वाढलंय, फिटनेस घसरलाय, तो मैदानावर गंभीर नसतो, तो आणखी काही बरंच काही करतो… असे आरोप त्याच्यावर सातत्यानं झाले. सराव सामन्यात सुरुवातीला फेल गेल्यानंतर टीकाकारांचा आवाज आणखी वाढला.
टिकाकारांचा वाढता आवाज बंद करण्यासाठी पंतकडून एका धमाकेदार इनिंगची गरज होती. पिंक बॉल टेस्टसाठी सुरु असलेल्या त्या सराव सामन्यात ती आली. पंतनं प्रॅक्टीस मॅचच्या दुसऱ्या दिवशी फक्त 73 बॉलमध्ये नाबाद 103 रन्स केले. त्यामध्ये त्याने त्याच्या खास शैलीत मनमुराद फटकेबाजी केली. 9 फोर आणि 6 सिक्सर्स लगावले.
(वाचा – उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’! )
एकाच ओव्हरमध्ये 22 रन्स!
एकाच सेशनमध्ये टेस्ट मॅच फिरवण्याची क्षमता पंतकडं का आहे? हे सिडनीत दिसलं. त्यानं हनुमा विहारीसोबत झंझावती 147 रन्सची पार्टरनरशिप केली. त्यात पंतचा वाटा 103 रन्सचा होता. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं 4 फोर आणि एक सिक्सरसह 22 रन काढले.
गिल, मयंक चमकले, शॉ ची पुन्हा निराशा
यापूर्वी दुसऱ्या दिवशी भारत ‘अ’ ची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ फक्त 3 रन काढून आऊट झाला. पृथ्वी सातत्यानं अपयशी होत असल्यानं त्याची पहिल्या टेस्टसाठीची जागा धोक्यात आलीय. पृथ्वी परतल्यावर मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी इनिंग सावरली.
मयंक आणि गिल या दोघांनीही हाफ सेंच्युरी झळकावली. या दोघांमध्ये गिल जास्त फॉर्मात होता. त्यानं 78 बॉलमध्ये 65 रन काढले. मयंक 61 रन काढून आऊट झाला. विराटच्या अनुपस्थितीमध्ये टीमचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं 38 रनची खेळी केली. तर टीम इंडियाचा आणखी एक टेस्ट स्पेशालिस्ट हनुमा विहारीनं सेंच्युरी झळकावत पहिल्या टेस्टपूर्वी उत्तम सराव केला.
(वाचा : पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव!)
टीम इंडियानं बॅट्समनला अधिक सराव मिळावा आणि बॉलर्सना कमी ओव्हर्समध्ये टार्गेट 10 विकेट्सचं घेता याव्या, या उद्देशानं संपूर्ण दुसरा दिवस बॅटिंग केली. भारतीय टीमकडं आता 472 रन्सची भक्कम आघाडी आहे. तिसऱ्या आणि अंतिम दिवशी ऑस्ट्रेलिया ‘अ’ ला ऑल आऊट करत प्रॅक्टीस मॅच जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.