फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील पहिली टेस्ट गुरुवारी (17 डिसेंबर 2020) रोजी अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) सुरुवात होणार आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धीमधील सीरिजची दिशा ही अनेकदा पहिल्या टेस्टमध्येच स्पष्ट होते. विशेषत: भारतीय टीम ऑस्ट्रेलियात कसं खेळेल याचा अंदाज ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये स्पष्ट व्हायला लागतो. आजपासून साधारण 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2003-04 साली देखील हेच झालं होतं. पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी या आठवणींना उजाळा देणे योग्य ठरेल.

भारतीय टीमला (Team India) लढाऊ चेहरा देणारा कॅप्टन अशी सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) ओळख आहे. मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing) प्रकरणानंतर गांगुली कॅप्टन झाला. त्याच्यात आत्मविश्वास सुरुवातीपासून होता. तोच आत्मविश्वास त्याने टीममध्ये ओतला. कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाची सलग 16 विजयी टेस्टची घौडदौड गांगुलीच्या टीम इंडियाने रोखली. ती सीरिज 2-1 ने जिंकून इतिहास घडवला.

भारतीय टीम 2003-04 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली तेंव्हा ऑस्ट्रेलिया पराभवाचा बदला घेण्यासाठी आतूर होती. कॅप्टन सौरव गांगुली त्यांचं मुख्य टार्गेट होता. टेस्ट करियरमध्ये सुरुवातीला लगावलेल्या दोन सेंच्युरी वगळता परदेशी पिचवर गांगुलीचा रेकॉर्ड चांगला नव्हता. गांगुलीलाही त्याची जाणीव होती. त्यामुळे सीरिज सुरु होण्यापूर्वीच त्याने ऑस्ट्रेलियात जाऊन ग्रेग चॅपेल यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते.

( वाचा : विराटच्या अंगावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने फेकला होता थ्रो! वाचा पुढे काय झाले…)

भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट टिपिकल ऑस्ट्रेलियन मैदान असलेल्या ब्रिस्बेनमध्ये झाली. ब्रिस्बेनच्या पिचवर भारतीय बॅट्समन्सना विशेषत: गांगुलीला न आवडणारी हिरवळ मुबलक होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 323 रन्स केले होते. घरच्या मैदानात लढण्यासाठी तो चांगला स्कोअर होता.

वीरेंद्र सेहवाग-आकाशा चोप्रा जोडीनं 61 रन्सची पार्टरनरशिप करुन सावध सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या तीन ओव्हर्समध्ये अवघ्या एक रन्सच्या बदल्यात सेहवाग, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर आऊट झाले. भारत द्वेष्टे अंपायर बकनर यांनी सचिनला वादग्रस्त पद्धतीने आऊट दिले होते. तीन मोठ्या धक्यानंतर सौरव गांगुली मैदानात उतरला.

भारताचा कायम द्वेष करणाऱ्या अंपायर बकनर यांनी सचिनची विकेट ढापली!

गांगुलीचं स्वागत ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी खास पद्धतीनं केलं, पण त्याचा निर्धार ढळला नाही. ग्रेग चॅपेल यांची शिकवणी देखील कामाला आली. गांगुलीनं 5 विकेटसाठी 146 रन्सची पार्टनरशिप केली. त्यात गांगुलीचा मोठा वाटा होता. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच बॉलर्सचा त्याने समाचार घेतला. त्याचे दीड सेंच्युरी फक्त सहा रन्सने हुकली. तो 196 बॉल्समध्ये 18 फोरच्या मदतीने 144 रन्स काढून आऊट झाला.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

सौरव गांगुलीची ब्रिस्बेनमधील दिशादर्शक खेळी!

गांगुलीच्या सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियाने नाजूक स्थितीमधून कमबॅक केलं. पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे ब्रिस्बेन टेस्ट ड्रॉ झाली. गांगुलीच्या झुंजार खेळीने संपूर्ण सीरिजची दिशा स्पष्ट झाली. ऑस्ट्रेलियाला ती सीरिज बरोबरीत रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. भारताविरुद्ध सीरिज जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचं स्टीव्ह वॉ चं स्वप्न पूर्ण झाले नाही.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: