
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन कोण असावा? याबाबत त्यांच्या टीममध्ये मतमतांतर सुरु झाली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेन आहे. (Tim Paine) आहे. पेन कॅप्टन झाल्यापासून तो तात्पुरता कॅप्टन आहे, हे सर्व जगाला माहिती आहे. 36 वर्षांचा पेन हा त्याच्या क्रिकेट करियरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर रिटायर होण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये पद्धत आहे. पेनही स्टीव्ह वॉ आणि गिलख्रिस्टच्या रांगेत जाण्यासाठी या मालिकेनंतर रिटायर होऊ शकतो, तशी चर्चाही सुरु आहे.
पेन रिटायर होईल किंवा होणार नाही, त्याच्या ऐवजी स्टीव्हन स्मिथला (Steven Smith) कॅप्टन करावे अशी मागणी पूर्वीपासून होत आहे. स्मिथ ऑस्ट्रेलियाचा नंबर वन बॅट्समन आहे, माजी कॅप्टन आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमध्ये त्यानं दोन सेंच्युरी झळकावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या T20 टीमचा व्हाईस कॅप्टन मॅथ्यू वेडनंही नुकतीच स्मिथ कॅप्टन व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली होती.
आता स्मिथ काय म्हणाला?
टेस्ट सीरिजसाठी सध्या सराव करत असलेल्या स्टीव्हन स्मिथला देखील हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, ‘टीमसाठी मला जे काही शक्य असेल ते मी करेल’ अशी सूचक प्रतिक्रिया स्मिथने दिली आहे. ‘मी सध्या जिथं आहे, तिथं खूश आहे, पण टीमच्या भल्यासाठी काहीही करण्यास तयार आहे’, हे सांगण्यास देखील स्मिथ विसरला नाही.
स्मिथची कॅप्टनसी का गेली?
मायकल क्लार्क रिटायर झाल्यानंतर स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झाला होता. स्मिथच्या कॅप्टनसीच्या काळात 2018 साली ऑस्ट्रेलियन प्लेयर्सनी बॉलची छेडछाड करण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे टीमचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ ने घातली होती. स्मिथवरील बंदीमुळे आरोन फिंच हा मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचा आणि टीम पेन हा टेस्ट टीमचा कॅप्टन झाला. स्मिथ 2019 साली वर्षभराची बंदी संपवून टीममध्ये परतला. मात्र, अजूनही ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने कॅप्टनसी दिलेली नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.