फोटो – ट्विटर/क्रिकेट ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वन-डे आणि T20 सीरिज आता संपली आहे. दोन्ही टीम्सना प्रतिष्ठेची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) सीरिजचे वेध लागलेत. टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियात मागील सीरिज जिंकली होती. त्यामुळे ही सीरिज जिंकूनच त्याचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया आतूर आहे.

ऑस्ट्रेलियच्या T20 टीमचा व्हाईस कॅप्टन मॅथ्यू वेड (Mathew Wade) यांनी ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन कोण असावा? याबद्दल एक महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. स्टीव्हन स्मिथला (Steven Smith) पुन्हा कॅप्टन केले तर टीम आणखी चांगली कामगिरी करेल असे मत वेडने व्यक्त केले आहे. वेड हा ऑस्ट्रेलियन T20 टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. T20 टीमचा कॅप्टन आरोन फिंच जखमी झाल्यानंतर दुसऱ्या T20 मध्ये वेड ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता.

काय म्हणाला वेड?

स्मिथ कॅप्टन व्हावा अशी वेडची जोरदार इच्छा आहे, असं दिसतं. “आमच्या टीममध्ये अनेक चांगले चांगले प्लेयर्स आहे. T20 मॅचमध्ये मला कॅप्टनसी देण्यात आली होती. मात्र, आमच्या टीममध्ये स्मिथ, मोझेस हेन्रीक्स हे बिग बॅश टीमचे कॅप्टन आहे. या प्लेयर्सकडे मोठा अनुभव असून आम्ही एकमेकांशी चर्चा करतो आणि मिळून एकत्र काम करतो. मैदानात मी कधीही एकटा नसतो. फिंच आमचा कॅप्टन आहे. स्मिथ देखील सल्ला देतो. स्मिथने  दीर्घकाळ चांगला कॅप्टन म्हणून काम केले आहे. त्याला पुन्हा कॅप्टन केले तर तो आणखी चांगले काम करेल’’.

स्मिथची कॅप्टनसी का गेली?

मायकल क्लार्क रिटायर झाल्यानंतर स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झाला होता. स्मिथच्या कॅप्टनसीच्या काळात 2018 साली ऑस्ट्रेलियन प्लेयर्सनी बॉलची छेडछाड करण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे टीमचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ ने घातली होती.  

स्मिथवरील बंदीमुळे आरोन फिंच हा मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचा आणि टीम पेन हा टेस्ट टीमचा कॅप्टन झाला. स्मिथ 2019 साली वर्षभराची बंदी संपवून टीममध्ये परतला. मात्र, अजूनही ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने कॅप्टनसी दिलेली नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: