फोटो – सोशल मीडिया

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border- Gavaskar Trophy) स्वत:कडे राखण्यासाठी टीम इंडियाला (Team India) स्टीव्हन स्मिथचा (Steven Smith) अडथळा पार करावा लागणार आहे. स्मिथने भारताविरुद्ध आतापर्यंत 7 सेंच्युरी झळकाल्या आहेत. भारताच्या मागील दौऱ्यात स्मिथ बंदीवास भोगत असल्याने टीममध्ये नव्हता. आता यंदा पुन्हा एकदा तो टीम इंडियाला त्रास देण्यासाठी सज्ज झालाय. स्मिथला रोखण्यासाठी टीम इंडियाच्या मदतीला धावलाय क्रिकेटमधील सर्वात मोठा खेळाडू अर्थातच सचिन तेंडुलकर. सचिननं (Sachin Tendulkar) स्मिथला आऊट करण्याचा प्लॅनच टीम इंडियाला दिला आहे.

( वाचा : आकडे बोलतात; भारताच्या विजयात स्टीव्हन स्मिथ ठरणार मोठा अडसर! )

काय आहे सचिनचा सल्ला?

“स्मिथचे तंत्र हे अपारंपारिक आहे. सामन्यपणे टेस्ट मॅचमध्ये बॉलर ऑफ स्टंपवर किंवा चौथ्या स्टंपवर बॉलिंग करतात. मात्र स्मिथ खेळताना सतत हलचाल करत असल्याने त्याला चौथ्या आणि पाचव्या स्टंपच्या दरम्यान बॉलिंग केली पाहिजे. स्मिथ शॉर्ट बॉलला तयार असेल. भारतीय बॉलर्स शॉर्ट बॉल टाकतील याचीही त्याला कल्पना असेल. त्यामुळे स्मिथ  बॅकफूटवर खेळावा आणि त्याने सुरुवातीलाच चूक करावी यासाठी प्रयत्न करा’’ असा सल्ला सचिनने दिला आहे.

(वाचा : मुंबईकर अजित आगरकरच्या भन्नाट स्पेलपुढे कांगारुंनी पत्कारली होती शरणागती! )

स्मिथचा भक्कम रेकॉर्ड

स्टीव्हन स्मिथने भारताविरुद्ध 10 टेस्टमध्ये 84.05 च्या सरासरीने 1429 रन्स काढले आहेत. ‘आयपीएल स्पर्धेत आपण फॉर्ममध्ये नव्हतो पण आता आपल्याला फॉर्म गवसलाय’ असं सांगत स्मिथने टीम इंडियाला सीरिज सुरु होण्यापूर्वीच इशार दिला आहे. आता सचिन तेंडुलकरचा सल्ला भारतीय बॉलर्स किती पाळतात आणि तो यशस्वी होतो का? हे लवकरच स्पष्ट होईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: