भारतीय टीमच्या 2007-08 ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनीमध्ये (Sydney) झालेली दुसरी टेस्ट चांगलीच वादग्रस्त ठरली होती. या टेस्टमध्ये घडलेले ‘मंकीगेट’ (Monkeygate Scandal) हे भारत-ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट टीममधील एक वादग्रस्त प्रकरण आहे.

काय आहे मंकीगेट?

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन अँण्ड्यू सायमंड्स याने केला होता. हरभजनने आपल्याला उद्देशून ‘मंकी’ हा वर्णद्वेषी शब्द वापरल्याचा सायमंड्सचा दावा होता. त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाला ‘मंकीगेट’ असे म्हंटले जाते.

( वाचा सविस्तर : वाचा सविस्तर : 26 डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या मॅचला ‘बॉक्सिंग डे’ का म्हणतात? )

वादाची पार्श्वभूमी

सिडनी टेस्टमधील ऑस्ट्रेलियन टीमची अखिलाडू वृत्ती आणि त्याला मिळालेली अंपायची साथ हे या वादाचे मुख्य कारण आहे. अंपायर स्टीव्ह बकनर पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बाजूने अनेक वादग्रस्त निर्णय दिले. बकनर यांच्या या निर्णयाचा रिकी पॉन्टिंग आणि सायमंड्सला मोठा फायदा झाला. अंपायर बकनरची साथ मिळाल्याने सायमंड्सने नाबाद 162 रन्स काढले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 463 रन्स काढले होते.

भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले. लक्ष्मण आणि सचिनने सेंच्युरी झळकावली. सौरव गांगुलीने हाफ सेंच्युरी काढली. भारतीय टीम लीड घेण्याच्या दिशेने वाटचाल करत होती. भारताचा स्कोअर 7 आऊट 451 असा होता. सचिन-हरभजन बॅटिंग करत होते. ऑस्ट्रेलियन टीमची अस्वस्थता वाढली होती. ब्रेट ली ने ओव्हरचा शेवटचा बॉल टाकल्यानंतर हरभजन-सायमंड्समध्ये शाब्दिक चकमक झाली.

या शाब्दिक चकमकीनंतर काही मिनिटातच अंपायर मार्क बेन्सन (ज्यांनी नंतर दुसऱ्या इनिंगमध्ये रिकी पॉन्टिंगचा आदेश मिळाल्यानंतर सौरव गांगुलीला आऊट दिले होते.) त्यांनी हरभजनला काही तरी सांगितले. बेन्सनचे वाक्य ऐकल्यानंतर हरभजन आश्चर्यचकीत झाला होता. हरभजनने आपल्याला उद्देशून ‘मंकी’ हा वर्णद्वेषी शब्द वापरल्याची तक्रार सायमंड्सने अंपायरकडे केली होती.

( वाचा : अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा! )

हरभजनला काय शिक्षा झाली?

हरभजन सिंग आणि त्याचा बॅटिंग पार्टनर सचिन तेंडुलकर दोघांनीही वर्णद्वेषी आरोप फेटाळले. ऑस्ट्रेलियन टीम आरोपावर ठाम होती. त्यांनी हे प्रकरण सामनाधिकारी माईक प्रॉक्टर यांच्याकडे नेले. प्रॉक्टर यांनी हरभजनला लेव्हल तीन अन्वये दोषी ठरवत तीन टेस्टची बंदी सुनावली. भारतीय टीमने हरभजनवरील आरोप फेटाळून लावले. या पक्षपाती निर्णयाच्या विरोधात गरज पडली तर उरलेल्या सीरिजवर बहिष्कार घालण्याची तयारी देखील बीसीसीआयनं (BCCI) केली होती.

बीसीसीआयने या निर्णयाला दिलेल्या आव्हानावर अ‍ॅडलेडच्या फेडरल कोर्टात आयसीसी (ICC) कमिशनर समोर सुनावणी झाली. यावेळी सायमंड्सच्या बाजूने पॉन्टिंग, हेडन आणि क्लार्क यांनी साक्ष दिली. हरभजनच्या बाजूने सचिन तेंडुलकरने साक्ष दिली. आयसीसी कमिशनरने या प्रकरणाचा निकाल देताना हरभजनवरील वर्णद्वेषी शेरेबाजीचे आरोप फेटाळून लावले. त्याचबरोबर त्याच्यावरील तीन टेस्टची बंदीही रद्द केली. हरभजनच्या मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम कापण्याचे आदेश आयसीसी कमिशनरने दिले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: