
‘करुन करुन थकला आणि देवपुजेला लागला’ अशी आपल्याकडं म्हण आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूबाबत ही म्हणीत थोडा बदल केला पाहिजे. ऑस्ट्रेलियाचा यापूर्वीचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) हा टीममधल्या नव्या खेळाडूला हाताशी धरुन केपटाऊन टेस्टमध्ये बॉल टेम्परिंग करताना पकडला गेला होता. सर्व जगानं छी-थू केली. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियानं’ (CA) एक वर्षाची बंदी घातली. सर्व बाजूनं अडकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्मिथ रडला होता.
स्मिथ बंदीनंतर परतला. पुन्हा चांगलं खेळू लागला. त्यानं भरपूर रन काढले. पण त्याची सवय काही गेली नाही. सिडनी टेस्टच्या (Sydney Test) शेवटच्या दिवशी पिच खराब करताना स्मिथ कॅमेऱ्यात सापडला.
स्मिथ चीटर असला तरी चांगला बॅट्समन आहे. स्मिथनंतरचा ऑस्ट्रेलियाचा नेता टीम पेन (Tim Paine) हा कॅप्टन आहे म्हणून टीममध्ये आहे. अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानं ICC नं पेनच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापून घेतली. स्मिथनं अश्विनला केलेलं स्लेजिंग (Sledging) सर्व जगानं पाहिलं. त्याचबरोबर त्याची तीन कॅच सोडणारी खराब विकेट किपिंग देखील पाहिली.
ऑस्ट्रेलियाच्याच ॲडम गिलख्रिस्टनं (Adam Gilchrist) एक कॅच सोडल्यानंतर रिटायरमेंट जाहीर केली होती. गिलख्रिस्टची जागा सांभाळणाऱ्या पेनच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही, कारण तो मुळात कॅप्टनशीपच्या कवचकुंडलावरच टीममध्ये खेळतोय.
( वाचा : ॲडलेडच्या आठवणी : एक कॅच सोडला आणि गिलख्रिस्ट लगेच निवृत्त झाला! )
पेन जाळ्यात सापडला!
दुखापतीचा वॉर्ड झालेल्या भारतीय टीमला (Team India) सिडनीमध्ये हरवणं ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या या खराब कामगिरीचा मोठा वाटेकरी हा पेन आहे. स्लेजिंग हे काही ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी नवं नाही. पण खराब खेळणं हे त्यांच्या फॅन्सला मान्य नसतं. निव्वळ स्लेजिंग करणाऱ्या आणि पाव डझन कॅच सोडणाऱ्या टीम पेनचं सध्या क्रिकेट विश्वात हसं होतंय. तसंच त्याच्यावर टीका देखील होत आहे.
आता म्हणतो, ‘मी मुर्ख ठरलो’
सिडनी टेस्ट संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्समध्ये पेननं त्याच्या चुकांची कबुली दिली आहे. “मी मॅच संपल्यानंतर लगेच त्याच्याशी (अश्विन) चर्चा केली. मी त्याला सांगितलं, शेवटी असं वाटलं की मी मुर्ख आहे. तुम्ही तोंड उघडता आणि कॅच सोडता, हे मी केलं नाही का? या टीमचं नेतृत्त्व करण्याचा मला अभिमान होता. सोमवारी ज्या घटना घडल्या त्याबद्दल मी माफी मागतो.’’
पेनला उपरती का झाली?
2018 साली झालेल्या केपटाऊन टेस्टमधील प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट हादरलं होतं. त्यानंतर टीम पेनला थेट कॅप्टनसीच्या घोड्यावर बसवण्यात आलं. अडचणीच्या वेळी कॅप्टन झाला म्हणून पेनबद्दल क्रिकेट विश्वात काहींना सहानुभूती वाटते.
ऑस्ट्रेलियानं इंग्लंडमध्ये ॲशेस सीरिज जिंकली आणि त्याच्या कॅप्टनसीची आणि टीममधील जागेची दोरी आणखी वाढली. आता भारत दौऱ्यानंतर आपली हकालपट्टी नक्की आहे, याची जाणीव पेनला झाली आहे. त्यामुळे रिटायरमेंटर चांगली प्रतिमा रहावी यासाठी पेनला ही उपरती झाली असावी, असा अंदाज आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.