फोटो- ट्विटर / Channel7

भारतीय बॉलर्सनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला अ‍ॅडलेड टेस्टच्या (Adelaide Test) पहिल्या इनिंगमध्ये  ऑस्ट्रेलियाला (Australia) 191 रन्सवर रोखले. भारतानं पहिल्या इनिंगमध्ये 53 रन्सची आघाडी घेतली. टीम इंडियाच्या (Team India) फिल्डर्सनी चांगली सर्व कॅच व्यवस्थित घेतल्या असत्या तर भारताला आणखी मोठी आघाडी घेता आली असती.

ऑस्ट्रेलियाचा उगवता स्टार मार्नस लाबुशेनपासून (Marnus Labuschagne) भारताच्या खराब फिल्डिंगची सुरुवात झाली.  पहिल्या सेशनमध्ये लाबुशेन 12 रन्सवर होता त्यावेळी शमीच्या बॉलवर बुमराहनं त्याला पहिले जीवदान दिले. लाबुशेननं फाईन लेगला मारलेला फटका मैदानाच्या बाहेर जाईल असं बुमराहला वाटलं त्यामुळे त्यानं घाई-घाईनं बॉल आत टाकला.

लाबुशेन दुसऱ्या सेशनमध्ये पुन्हा एकदा सुदैवी ठरला. बुमराहच्या बॉलवर पृथ्वी शॉ (Prithwi Shaw) ने त्याचा कॅच सोडला. तेंव्हा लाबुशेन 21 वर खेळत होता. लाबुशेन अखेरीस 47 रन्सवर आऊट झाला.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनलाही ( Tim Paine) जीवदान मिळाले. 55 व्या ओव्हर्सच्या पाचव्या बॉलवर बुमराहनं बाऊंसर टाकला होता. तो बाऊंसर पेननं स्क्वेअर लेगला खेळला. त्यावेळी मयांक अग्रवालने त्याला जीवदान दिले. पेन 73 रन्स काढून शेवटपर्यंत नाबाद होता.

भारताचा विकेट किपर ऋद्धीमान साहानं मिचेल स्टार्कला जीवदान दिले. अर्थात तो अवघड कॅच होता. 59 व्या ओव्हरमध्ये बुमराहनं टाकलेला बॉल स्टार्कच्या बॅटच्या कड्याला लागून उंच उडाला. साहा तो कॅच घेण्यासाठी मागे पळाला, पण त्याचा अंदाज चुकला.

( वाचा : IND vs AUS : टीम इंडियाला मार्गशीर्षमध्ये ‘अश्विन’ पावला, भारताकडं दुसऱ्या दिवसाखेर 62 रन्सची आघाडी )

भारतीय ब़ॉलर्स गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी करत आहेत. त्याचवेळी भारतीय फिल्डिंगचा दर्जा घसरला आहे. यापूर्वी सेफ समजले जाणारे फिल्डरही सर्रास कॅच सोडत आहेत. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर हे सर्व गांभीर्यानं कधी घेणार? असा प्रश्न क्रिकेट फॅन्स आता विचारत आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: