फोटो – सोशल मीडिया

विराट कोहली (Virat Kohli) कौटुंबिक कारणामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) स्पर्धेतील एक टेस्ट खेळून माघारी परतणार आहे. मात्र या सीरिजमध्ये विराटच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. विशेष म्हणजे विराट ज्या ॲडलेडमध्ये (Adelaide) एकमेव टेस्ट खेळणार आहे, त्याच ठिकाणी त्याने हा खास रेकॉर्ड केलाय.

बॉर्डर-गावस्कर सीरिजमधील दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणारा विराट हा एकमेव बॅट्समन आहे. विराट कोहलीने 2014 साली ॲडलेड टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली होती. विराटने पहिल्या इनिंगमध्ये 115 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 141 रन्स केले होते. त्या सीरिजमध्ये विराट जबरदस्त फॉर्मात होता. त्याने सीरिजमध्ये एकूण चार सेंच्युरी झळकावल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटनं आजवर 19 टेस्ट खेळल्या आहेत. यामधील 34 इनिंगमध्ये त्याने 48.60 च्या सरासरीने 1604 रन्स काढलेत. 169 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर असून त्याने सात सेंच्युरी आणि चार हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्याचबरोबर विराट तीन वेळा शून्यावर देखील आऊट झालाय.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: