
टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. विराट मैदानावर असताना त्याच्या भावना कधीही लपवत नाही. समोरच्या टीमने त्याला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले तर विराटचा खेळ आणखी बहरतो. विराट कोहलीचा ‘किंग कोहली’ पर्यंतचा प्रवास हा ऑस्ट्रेलियन टीमने मैदानात डिवचल्यानंतरच घडला आहे.
भारतीय टीम 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आली होती तेंव्हा विराटचा फॉर्म खास नव्हता. त्यापूर्वी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. भारतीय टीमचा उगवता सुपरस्टार खराब फॉर्मशी झगडत होता. त्याचवेळी त्याला डिवचण्याचं ऑस्ट्रेलियाने ठरवले होते.

ऑस्ट्रेलियन टीमनं विराट कोहलीला ‘बिघडलेला मुलगा’ असे म्हंटले होते. त्यामुळे नाराज झालेल्या विराटने मेलबर्न टेस्टमध्ये बॅटनं उत्तर द्यायला सुरुवात केली. शेरेबाजीत कायम अव्वल असणारा मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) विराटचे मुख्य लक्ष्य होता. आपल्याला काही ऑस्ट्रेलियन प्लेयर्सबद्दलच आदर वाटतो, सर्वांबद्दल नाही असे विराटने यापूर्वीच जाहीर केले होते.
( वाचा : ‘स्मिथला या पद्धतीनं आऊट करा’; सचिनचा भारतीय बॉलर्सना सल्ला )
मैदानाबाहेर आणि मैदानात दोन्ही ठिकाणी विराट ऐकत नाही हे पाहून मिचेल जॉन्सनचा पारा चढला. त्याने कोहलीने मारलेला एक फटका अडवून कोहीलीच्या दिशेने जोराने बॉल फेकला होता. त्यावेळी विराट आणि जॉन्सनमध्ये जोरदार शेरेबाजी झाली. अर्थात विराटवर जॉन्सनच्या शेरेबाजीचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने मेलबर्न टेस्टमध्ये 169 रन्स काढले. त्या सीरिजमध्ये विराटला त्याचा फॉर्म सापडला आणि विराटचा किंग कोहली होण्याचा प्रवास सुरु झाला….

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफतअपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.