
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील टेस्ट सीरिजला गुरुवारपासून अॅडलेडमध्ये (Adelaide) सुरुवात होणार आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट ही डे-नाईट टेस्ट आहे. गुलाबी बॉलमध्ये (Pink Ball) होणारी टेस्ट जिंकून टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. पहिली टेस्ट पराभूत झालेल्या टीमला सीरिजमध्ये कमबॅक करणे अशक्य नसलं तरी अवघड असणार आहे. त्यामुळे ही टेस्ट मोठ्या चुरशीची होईल हे निश्चित. अॅडलेड टेस्टमध्ये कोणते पाच खेळाडू सर्वात जास्त प्रभाव टाकतील ते पाहूया
विराट कोहली (Virat Kohli)
या यादीमधलं पहिलं नाव. विराटचा ‘किंग कोहली’ होण्याचा प्रवास याच मैदानात सुरु झाला. ऑस्ट्रेलियात विराटची लोकप्रियता मोठी आहे. तो यंदा या सीरिजमध्ये एकमेव टेस्ट खेळणार असल्यानं त्याच्या खेळाकडं ऑस्ट्रेलियाचं आणखी लक्ष असेल.
विराटनं 2014 साली अॅडलेड टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) असा पराक्रम करणारा तो आजवरचा एकमेव खेळाडू आहे. याच मैदानावर 2018 साली विराटच्या कॅप्टनसीखाली भारतानं टेस्ट जिंकली होती. आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी विराट सज्ज झाला आहे.
( वाचा : ॲडलेड : ऑस्ट्रेलियाच्या भक्कम किल्ल्याचा ‘किंग’ कोहली! )
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हमखास खेळणारा व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) रिटायर झाला आणि त्याची जागा चेतेश्वर पुजारानं घेतली. मागील सीरिजमध्ये पुजारानं पहिल्या टेस्टमध्ये संयमी सेंच्युरी झळकावली होती. त्या सेंच्युरीनं टेस्ट सीरिजची दिशा स्पष्ट केली होती. ऑस्ट्रेलियाला मागील दोन टेस्ट सीरिजमध्ये पराभूत टीम इंडियानं पराभूत केले आहे. या दोन्ही सीरिजमध्ये पुजारानं भारताकडून सर्वात जास्त रन्स केले आहेत. यंदाही पुजाराच्या भक्कम बॅटिंगच्या जोरावर सीरिज जिंकण्याची हॅट्ट्रिक करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
( वाचा : चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार! )
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
जसप्रीत बुमराहच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलियात झाली. त्यामुळे बुमराहसाठी ऑस्ट्रेलिया नेहमीच खास आहे. शॉन मार्शला मागील टेस्ट सीरिजमध्ये बुमराहनं एक अविस्मरणीय बॉल टाकला होता. आता इशांत शर्माच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय फास्ट बॉलर्सचं नेतृत्व बुमराहकडे आहे. भारतीय बॅट्समन्सच्या चांगल्या कामगिरीला पूरक खेळ करणे किंवा त्यांच्या खराब खेळावर पांघरुण घालणे अशा दोन्ही भूमिकेसाठी बुमराह हाच टीम इंडियाचा मुख्य कलाकार आहे.
( वाचा : टीम इंडियाची प्रॅक्टीस उत्तम, आता परीक्षेची प्रतीक्षा! )
स्टीव्हन स्मिथ (Steven Smith)
भारताने मागील टेस्ट सीरिज 2-1 नं जिंकली तेंव्हा स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियन टीममध्ये नव्हता. आता तो परतलाय. ऑस्ट्रेलियाचं रन मशिन असलेल्या स्मिथचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड अतिशय जबरदस्त आहे. वन-डे सीरिजमध्ये देखील दोन सेंच्युरी झळकावत स्मिथनं टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिलाय. स्मिथला लवकर आऊट केलं नाही तर भारतीय टीम मोठ्या अडचणीत सापडू शकते.
( वाचा : आकडे बोलतात; भारताच्या विजयात स्टीव्हन स्मिथ ठरणार मोठा अडसर! )
नॅथन लायन (Nathan Lyon)
ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्स इतकी नॅथन लायनबद्दल कधीही चर्चा होत नाही. लायन हा भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलियन बॉलर आहे. हे सत्य कदाचित अनेकांना माहिती नसेल. भारताविरुद्ध टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीमध्ये देखील लायन हा जेम्स अँडरसन, मुरलीधरन, इम्रान खान यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचा भारताविरुद्धचा फॉर्म लक्षात घेता तो या सीरिजमध्ये इम्रान खानला सहज मागे टाकू शकतो.
( वाचा : स्मिथ-वॉर्नर नाही तर ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचा आहे टीम इंडियाला मोठा धोका! )
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.