
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टीम इंडियाला (India Tour Of Australia) लागलेल्या दुखापतींचं शुक्लाष्ठ काही सुटत नाही. या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा जखमी झाले होते. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच कारणांमुळे शेवटच्या टप्प्यात टीममध्ये सहभागी झाला. या दौऱ्यात आतापर्यंत मोहम्मद शमी, उमेश यादव, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी हे खेळाडू दुखापतीमुळे सीरिजमधून आऊट झाले आहेत. त्यापाठोपाठ भारतीय बॉलिंगचा मुख्य चेहरा असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील ब्रिस्बेन टेस्टमधून आऊट झाल्यानं टीमला मोठा धक्का बसला आहे.
इशांत, शमी, भुवनेश्वर आणि उमेश हे सर्व सहकारी जखमी झाल्यानं बुमराह हा एकमेव अनुभवी फास्ट बॉलर ब्रिस्बेनसाठी टीममध्ये शिल्लक होता. आता तो देखील ब्रिस्बेन टेस्टसाठी आऊट झाल्यानं भारतीय फास्ट बॉलिंचा अटॅक हा अगदीच अनअनुभवी (Inexperienced) आहे.
भारताच्या बॅटिंगमध्येही फारशी चांगली परिस्थिती नाही. सिडनी टेस्टपूर्वी के.एल. राहुल दुखापतीमुळे आऊट झाला. तर आता सिडनी टेस्ट गाजवणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari) देखील सिडनीमध्ये खेळणार नाही. मयंक अग्रवालही दुखापतग्रस्त झाल्याची बातमी असून त्याचंही पुढील टेस्ट खेळणं अनिश्चित आहे. रवींद्र जडेजा नसल्याचा परिणाम हा बॅटिंगवरही होणार आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत देखील पूर्णपणे फिट नाही.
( वाचा : IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का, रवींद्र जडेजा सीरिजमधून आऊट )
सेहवागची ऑफर
टीम इंडियाचा माजी ओपनर आणि आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) ही सर्व परिस्थिती पाहून BCCI ला एक खास ऑफर दिली आहे. सेहवाग त्याच्या मिश्किल पोस्टसाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. त्याच्या बॅटिंगसारखेच त्याचे ट्विट्सही कोणत्याच चौकटीत बंदिस्त नसतात. त्यामुळे त्याची अनेकदा बातमी होते.
सेहवाग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “ इतके सर्व खेळाडू हे सध्या जखमी होत आहेत. त्यामुळे जर संपूर्ण 11 जणांची टीम तयार होत नसेल तर मी ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. क्वारंटाईनचं पाहता येईल.’’
वीरेंद्र सेहवाग हा टेस्ट क्रिकेटचा नवाब हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बनला होता. 2003 च्या मेलबर्न टेस्टमध्ये (Melbourne Test) सेहवागनं 195 रन्सची आक्रमक खेळी केली होती. भारतीय बॅट्समन उपखंडाच्या बाहेर टेस्ट क्रिकेटमध्ये आक्रमक खेळून समोरच्यांचा घाम काढू शकतो हे सेहवागनं तेंव्हा दाखवलं होतं.
( वाचा : मेलबर्न टेस्टमध्ये यापूर्वी कुणीही केले नव्हते ‘ते’ वीरेंद्र सेहवागने केले! )
जगातील कोणत्याही ऑफ स्पिनरला सेहवागनं कधीही डोक्यावर बसू दिलं नाही. सेहवाग प्रत्यक्षात ब्रिस्बेन टेस्ट खेळणं शक्य नाही. पण तो ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीला खेळण्यासाठी उतरला अशी फँटसी डोळ्यासमोर आणली तर आजही तो नॅथन लायनच्या बॉलला ऑस्ट्रेलियातील टर्रेबाज प्रेक्षकांमध्ये भिरकावून देईल याबद्दल कोणत्याही भारतीय फॅन्सना शंका नाही!
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.