फोटो – ट्विटर

भारताचा माजी ओपनर वासिम जाफर (Wasim Jaffer) हा सध्या सोशल मीडियावर जोरदार सक्रीय आहे. जाफरंचं प्रत्येक ट्विट हे सामान्यांच्या गर्दीत वेगळं असतं म्हणून ती बातमीचा मुद्दा बनतं. क्रिकेटच्या विषयावर कधी मिश्किल, कधी रोखठोक तर कधी गूढ भाषेत जाफर ट्विट करत असतो. त्यानं आता सिडनी टेस्टपूर्वी (Sydney Test) टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) एक गूढ संदेश पाठवला आहे.

काय आहे जाफरचा संदेश?

जाफरनं मेलबर्न टेस्टपूर्वी देखील रहाणेला एक संदेश पाठवला होता. त्यामध्ये त्यानं के.एल. राहुल (K.L. Rahul) आणि शूभमन गिलला (Shubhman Gill) टीममध्ये घेण्याचा सल्ला दिला होता. त्यापैकी रहाणेनं गिलला टीममध्ये घेतलं. पण राहुलला घेण्याचा सल्ल्याचं पालन केलं नाही.

( वाचा : वासिम जाफरने अजिंक्य रहाणेला दिलेल्या गूढ संदेशाचा अर्थ माहिती आहे का? )

आता सिडनी टेस्टपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये जाफर म्हणतो, “ आज मी एका तलावाच्या किनाऱ्याजवळून गेलो. तिथं मी सुंदर फिल्टर कॉफी घेतली. मासे पाण्याच्या आतमध्ये श्वास घेऊ शकतात हे खूप खास आहे. त्यानंतर मी चे गव्हेराच्या पेंटींगच्या जवळून गेलो. पुन्हा मी डोंबिवलीचा रहिवाशी असलेल्या एका जुन्या मित्राला धडकलो. ज्याचं आता बोरिवलीला एक रेस्टॉरंट आहे. सिडनी टेस्टसाठी गुड लक अजिंक्य रहाणे. ’’

काय आहे अर्थ?

जाफरचं ट्विट वर-वर पाहिलं तर यामध्ये काही तरी काव्यात्मक अर्थ आहे, असं एखाद्याला वाटू शकेल. वास्तविक जाफरनं यामधून टीम इंडियाची सिडनी टेस्टमधील बॅटिंग ऑर्डर सांगितली आहे.

या ट्विटमधील फिल्टर कॉफी म्हणजे के.एल. राहुल आहे. जो ‘कॉफी विथ करन’ या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे वादात सापडला होता. शुभमन गिलला त्यानं माशांची उपमा दिली आहे. त्यानंतर चे गव्हेरा म्हणजे चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) बॅटिंगला यावं असं जाफर सुचवतो. ‘जुना मित्र’ या शब्दातून त्यानं रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव घेतलं आहे. तर डोंबिवली या शब्दात अजिंक्य रहाणे हे नाव त्यानं सुचवलं आहे.

याचाच अर्थ सिडनी टेस्टमध्ये के.एल. राहुल आणि शुभमन गिल यांनी ओपनिंग करावी. पुजारानं तिसऱ्या तर रोहित शर्मानं चौथ्या क्रमांकावर खेळावं आणि कॅप्टन अजिंक्य रहाणेनं पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला यावं असा सल्ला जाफरनं या ट्विटमधून दिला आहे.

( वाचा : अजिंक्य रहाणेच्या अविस्मरणीय सेंच्युरीवर जळणाऱ्या ब्रिटीश मीडियाला वासिम जाफरने दिलं खणखणीत उत्तर! )

भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरी टेस्ट सात जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरु होणार आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: