फोटो – इन्स्टाग्राम

मुंबईकर वासिम जाफर (Wasim Jaffer) हा त्याच्या हटके शैलीतल्या ट्विटसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. आयपीएल स्पर्धा असो किंवा भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज त्याचे खास शैलीतले ट्विट सर्वांचं नेहमी लक्ष वेधून घेतात. एक गंभीर क्रिकेटपटू म्हणून त्याच्या कारकीर्दीत ओळखल्या गेलेल्या जाफरचा हा अवतार सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा आहे.

सध्या उत्तराखंड रणजी टीमचा कोच असलेल्या जाफरचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ट्विटमधून त्याने त्याचा मुंबईकर सहकारी आणि टीम इंडियाचा उर्वरित टेस्ट सीरिजसाठीचा कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane)  एक खास संदेश दिला आहे. ‘कोड वर्ड’चा वापर करुन जाफरने गूढ संदेश दिला आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

‘प्रिय अजिंक्य रहाणे, बॉक्सिंग डे टेस्ट मॅचसाठी मी तुला एक गुप्त संदेश पाठवत आहे’, असे सांगत जाफरने एक ट्विट केले आहे.

जाफरने या ट्विटमधून शुभमन गिल (Shubman Gill ) आणि के.एल. राहुल (K.L. Rahul) यांना बॉक्सिंग डे टेस्टमध्ये संधी द्यावी असा या गुप्त संदेशाचा अर्थ आहे.  

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार टेस्टच्या सीरिजमधली पहिली टेस्ट हरल्यानंतर सध्या टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. टीम इंडियाची दुसरी टेस्ट मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कॅप्टन विराट कोहली पितृत्वाची रजा घेऊन भारतामध्ये परतणार असल्याने तो उर्वरित सीरिज खेळणार नाही. त्यामुळे आगामी तीन टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे टीमचे नेतृत्व करणार आहे.

( वाचा : मोठी बातमी: ऋद्धीमान साहाचे टेस्ट करियर होणार समाप्त? )

सुनील गावस्करांचा सल्ला

भारतीय बॅट्समन्सच्या कामगिरीवर सध्या जोरदार टीका होत असताना भारताचे महान बॅट्समन सुनील गावस्कर (Suni Gavaskar) यांनी ‘भारतीय बॅट्समन्सचा बचाव केला आहे. भारताचा एकही बॅट्समन खराब शॉट खेळून आऊट झाला नाही. काही वेळा परिस्थिती तुमच्या हातात नसते,’ असे गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी म्हंटले होते. भारतीय टीमच्या खराब कामगिरीची गावस्कर यांनी 1974 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय टीमने केलेल्या कामगिरीची तुलना केली आहे. गावस्करांचा समावेश असलेली त्या टीमची दुसरी इनिंग 42 रन्सवर संपुष्टात आली होती. भारतीय टेस्ट क्रिकेटमधील तो निचांक यावर्षी विराट कोहलीच्या टीमने मोडला.

( वाचा : लॉर्ड्स 1974 ते अ‍ॅडलेड 2020, दोन लज्जास्पद कामगिरीमधील अजब योगायोग! )

गावस्कर यांनी सर्व प्रकारचे नकारात्मक वातावरण ड्रेसिंग रुमच्या बाहेर ठेवा असे सांगत टीममध्ये दोन बदल सुचवले आहेत. पृथ्वी शॉ च्या जागी के.एल. राहुलला आणि विराट कोहलीच्या जागी शुभमन गिलचा टीममध्ये समावेश करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. यावर्षी फॉर्मात असलेल्या राहुलने मेलबर्न टेस्टमध्ये ओपनिंगला यावे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: