
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील मेलबर्नमध्ये झालेली ‘बॉक्सिंग डे’ (Boxing Day) टेस्ट टीम इंडियानं (Team India) आठ विकेट्सनं जिंकली. या विजयामुळे सध्या चार टेस्टची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ( Border- Gavskar Trophy) सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या टेस्टची तयारी करणाऱ्या टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर टीममध्ये दाखल झाला आहे.
रोहित शर्माला आयपीएल (IPL) स्पर्धेच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा सुरुवातीला टीममध्ये समावेश करण्यात आला नव्हता. बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) झालेली फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. ऑस्ट्रेलियातील नियमानुसार रोहितनं 14 दिवस सिडनीतील हॉटेलमध्ये एकट्यानं काढले. 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर रोहित आता टीममध्ये दाखल झाला आहे.
( वाचा : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत काय, काय घडले? )
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रोहितच्या टीममधील एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडिया मेलबर्नमध्ये राहत असलेल्या हॉटेलमध्ये रोहित दाखल होताच सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. यावेळी रोहितनं काही सहकरी खेळाडूंची गळाभेटही घेतली. त्यानंतर रोहित टीमचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना भेटण्यासाठी आला. तेंव्हा शास्त्रींनी त्याला विचारलं, ‘क्वारंटाईन कालावधी कसा होता?’ त्यावर रोहितनं ‘बढीया’ असं उत्तर देताच सर्वांनी हसून त्याला दाद दिली.
रोहित टीममध्ये का हवा?
भारताला सध्या सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याची संधी आहे. मेलबर्न टेस्ट जिंकून आत्मविश्वास उंचावलेल्या टीममध्ये रोहितच्या आगमानामुळे आणखी उत्साह वाढला आहे. यापूढील दोन्ही टेस्ट या सीरिजसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या परिस्थितीमध्ये रोहितच्या अनुभवाचा टीमला फायदा होऊ शकतो. मागील ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये रोहितच्या सल्ल्यानंतरच जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) शॉन मार्शला (Shaun Marsh) सीरिजमधील सर्वोत्तम बॉल टाकला होता.
रोहित आणि अजिंक्य हे दोघेही मुंबईकर आहेत. दोघे एकत्र क्रिकेट भरपूर खेळले असल्यानं त्यांना परस्परांच्या स्वभावाचा चांगला अंदाज आहे. अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनसीनं मेलबर्नमध्ये सर्वांनाच प्रभावित केले होते. अजिंक्यच्या मैदानातील वावराला पूरक असा रोहितचा स्वभाव आहे. त्याच्या कॅप्टनसीमधले गुण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व जगानं पाहिले आहेत. रोहित आणि अजिंक्यची जोडी आता ऑस्ट्रेलियात कमाल करण्यास सिद्ध झाली आहे.
( वाचा : IND vs AUS: रहाणेच्या सेंच्युरीमुळे टीम इंडिया मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’ )
बॅटिंगला आधार!
टीम इंडियाला सध्या ओपनिंगची समस्या भेडसावत आहे. शुभमन गिलनं मेलबर्नमध्ये चांगली कामगिरी केली. त्याचा जोडीदार मयांक अग्रवाल मात्र फेल गेला. रोहितचा मयांकच्या जागी टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. आक्रमक बॅट्समन असलेला रोहित शर्मा एकाच सेशनमध्ये मॅचचं चित्र बदलू शकतो. रोहित मोठ्या इनिंगसाठी ओळखला जातो. वन-डे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी झळकावणारा रोहित हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचा दिवस असेल तर तो वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) रेकॉर्डही मोडू शकतो यामध्ये कुणालाही शंका नाही. विराटच्या अनुपस्थितीमध्ये कमकुवत झालेल्या बॅटिंगला आता रोहितचा आधार मिळणार आहे.
( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )
आयपील स्पर्धा पाचव्यांदा जिंकल्यानंतर रोहित पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात उतरेल तेंव्हा त्याच्या मनात आयपीएलच्या सकारात्मक आठवणी ताज्या असतील. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमधला आपला रेकॉर्ड आणखी सुधारण्याची त्याला ऑस्ट्रेलियात संधी आहे. सीरिज बरोबरीत असताना रोहित शर्माची टीममधील एन्ट्री ही भारताच्या फायद्याची असून ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.