
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौऱ्यावर पहिल्यांदा गेला होता, तेंव्हा तो 18 वर्षांचा होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन आव्हानात्मक दौरे त्यानं पूर्ण केले होते. इंग्लंडमध्ये वयाच्या 17 व्या वर्षी ओल्ड ट्रॅफर्डवर (Old Trafford) त्यानं पहिली सेंच्युरी झळकावली होती. पाकिस्तानमधील विखारी आणि इंग्लंडमधील स्विंग वातावरणात तो मतदानाचा अधिकार मिळण्यापूर्वी उभा राहिला. नुसता उभा राहिला नाही, तर तिथं त्यानं स्वत:ला सिद्ध केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर होता.
जगातील बेस्ट बॅट्समनना त्यांच्या काळातील बेस्ट टीमविरुद्ध त्यांच्याच देशात जाऊन खेळायला आवडतं. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा वेस्ट इंडिजमधला (West Indies) रेकॉर्ड तगडा आहे. सचिननंही गावस्कर यांच्याप्रमाणे सर्वोत्तम खेळ करण्यासाठी त्याच्या काळातील बेस्ट टीम असलेल्या ऑस्ट्रेलियाची निवड केली.
सचिन तेंडुलकरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 टेस्टमधील 74 इनिंगमध्ये तब्बल 55 च्या सरासरीनं 3630 रन्स काढले आहेत. यामध्ये 11 सेंच्युरी आणि 16 हाफ सेंच्युरींचा समावोश आहे. सिडनीच्या मैदानावर खेळलेली नाबाद 241 ही सचिनची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या.
( वाचा : Video: सिडनी टेस्टच्या आठवणी, सचिन तेंडुलकर नाबाद 241! )
सचिन vs ऑस्ट्रेलिया
टेस्ट | 39 |
इनिंग | 74 |
रन्स | 3630 |
सरासरी | 55.00 |
100/50 | 11/16 |
सर्वोच्च | 241* |
ऑस्ट्रेलियातील टॉप पिचवर त्या काळातील टॉप बॉलर्सविरुद्ध त्यांच्याच घरात सचिनची बॅट नेहमी चालली. सचिननं ऑस्ट्रेलियात 20 टेस्टमधील 38 इनिंगमध्ये 53.20 च्या सरासरीनं 1809 रन काढले आहेत. यामध्ये 6 सेंच्युरी आणि 7 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. सचिननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात नाही तर ऑस्ट्रेलियात एक टेस्ट सेंच्युरी जास्त झळकावली आहे.
ऑस्ट्रेलियात सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
टेस्ट | 20 |
इनिंग | 38 |
रन्स | 1809 |
सरासरी | 53.20 |
100/50 | 6/7 |
सर्वोच्च | 241* |
सचिनची ऑस्ट्रेलियन बॉलर्सवरील वर्चस्वाची सुरुवात ही 1991-92 च्या दौऱ्यात झाली. मोहम्मद अझहरुद्दीनच्या (Mohammad Azharuddin) नेतृत्वाखाली तेंव्हा भारतीय टीम ऑस्ट्रेलियात गेली होती. पाच टेस्टच्या त्या सीरिजमध्ये भारताचा (Team India) 0-4 असा सपाटून पराभव झाला. या पराभवातही कोवळ्या सचिनच्या खेळानं भारतीय फॅन्सना दिलासा दिला होता.
सचिननं पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून सर्वात जास्त रन्स काढले होते. सचिननं त्या दौऱ्यातील 5 टेस्टमध्ये 46 च्या सरासरीनं 368 रन्स काढले होते. यामध्ये 2 सेंच्युरींचा समावेश होता. सिडनी आणि पर्थ टेस्टमध्ये सचिननं सेंच्युरी झळकावली होती.
पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सचिन
टेस्ट | 5 |
इनिंग | 9 |
रन्स | 368 |
सरासरी | 46.00 |
100/50 | 2/0 |
सर्वोच्च | 148* |
सचिनची ऑस्ट्रेलियातील पहिली इनिंग!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथी टेस्ट जिथं होणार आहे त्याच ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) सचिननं ऑस्ट्रेलियातील पहिली इनिंग खेळली होती. या टेस्टमध्ये सचिन पहिल्या इनिंगमध्ये 16 रन काढून आऊट झाला होता. माईक व्हिटनीनं (Mike Whitney) त्याला आऊट केलं होतं. तर ब्रिस्बेन टेस्ट दुसऱ्या इनिंगमध्ये सचिननं 7 रन काढले होते. सचिनच्या ऑस्ट्रेलियातील पहिल्या इनिंगचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियातील पहिल्या टेस्टमध्ये 23 रन्सच करता आले होते. पण त्यानंतर पुढील 23 वर्ष सचिननं ऑस्ट्रेलियाला चांगलंच सतावलं.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.