फोटो – ट्विटर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (World Test Championship Final 2021) पराभवानंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. बॉलर्सच्या नाही तर जगात भारी समजल्या जाणाऱ्या भारतीय बॅट्समनच्या साधारण कामगिरीमुळे टीम इंडियाने पहिली टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची ऐतिहासिक संधी गमावली. कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) देखील या पराभवानंतर बॅट्समनच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता नव्या बॅट्समनला इंग्लंड विरुद्ध संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडं असलेल्या पर्यायापैकी केएल राहुल (KL Rahul) हा सर्वोत्तम पर्याय (KL Rahul Should Play) असून तो टेस्ट टीममध्ये खेळणे हे आवश्यक आहे.

राहुल कधीपासून बाहेर?

आंतरराष्ट्रीय T20 आणि वन-डे टीमचा नियमित सदस्य असलेला राहुल 2019 साली वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटची टेस्ट खेळला आहे. टीम इंडियानं ती सीरिज 2-0 अशी जिंकली. पण, त्या सीरिजमध्ये राहुलला कमाल करता आली नाही. किंग्सटनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये राहुलनं 13 आणि 6 रन काढले. दुसऱ्या इनिंगमध्ये 63 बॉल खेळल्यानंतरही तो 6 रनवर परतला. त्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आले.

मागील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यात वन-डे आणि T20 सीरिजमध्ये चांगली कामगिरी करुनही त्याचा टेस्ट टीमसाठी विचार झाला नाही. राहुल टीममधून आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) नियमित टेस्ट ओपनर बनला. मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि आता शुभमन गिल असे ओपनर टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाकडून खेळले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (दुखापतीमुळे परतण्यापूर्वी) किंवा इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये झालेल्या दौऱ्यात राहुल टीमचा सदस्य होता. पण त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही. तसंच इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होऊनही फायनल मॅचसाठी निवडण्यात आलेल्या अंतिम 15 जणांमध्ये राहुलचा समावेश नव्हता.

ओपनिंगला चांगला पर्याय

केएल राहुल हा नियमित ओपनर आहे. राहुलच्या टेस्टमधील सर्व पाच सेंच्युरी त्यानं ओपनिंग बॅट्समन म्हणून काढल्या आहेत. या 5 पैकी 4 सेंच्युरी या विदेशातील आहेत. किंग्सटन, सिडनी, कोलंबो आणि ओव्हल या चार वेगवेगळ्या मैदानात, चार वेगळ्या खंडात राहुलनं सेंच्युरी झळकावली आहे.

राहुलनं 2017 साली सलग 7 टेस्ट इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता. त्या सातपैकी 6  हाफ सेंच्युरी त्यानं ओपनर म्हणून लगावल्या आहेत.  तसंच त्या टेस्ट करियरमधील 11 पैकी 10 हाफ सेंच्युरी या ओपनिंग बॅट्समन (KL Rahul Should Play) म्हणून आहेत.  

वन-डे पदार्पणात सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय

इंग्लड दौऱ्यात सेंच्युरी

टीम इंडियाच्या शेवटच्या इंग्लंड दौऱ्यात ओव्हल टेस्टमध्ये राहुलनं चौथ्या इनिंगमध्ये 464 रनचा पाठलाग करताना 149 रनची खेळी केली होती. ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपवाद वगळता अन्य कोणत्याही बॅट्समननं साथ न दिल्यानं टीम इंडियानं ती टेस्ट गमावली. पण, चौथ्या इनिंगमध्ये मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना सेंच्युरी करण्याची आणि दीर्घकाळ बॅटींग करण्याची क्षमता असल्याचं त्यानं दाखवून दिलं.

राहुलकडे असलेला अनुभव इंग्लडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ओपनिंगसाठी दावेदारी सांगण्यासाठी पुरेसा आहे. अँकर म्हणून मैदानात उभे राहणे आणि सेट झाल्यानंतर, परिस्थिती अनुकूल बनल्यानंतर वेगाने रन करणे या दोन्ही क्षमता राहुलमध्ये (KL Rahul Should Play) आहेत.

पुजाराला पर्याय

चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) मागील 30  इनिंगमध्ये सेंच्युरी करता आलेली नाही. या काळात विशेषत: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो काही चांगल्या खेळी खेळला. पण, सेंच्युरीची लांबलेली प्रतीक्षा त्याच्या दर्जाच्या टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समनला शोभणारी नाही.

पुजारा या काळात 9 वेळा एक अंकी रन काढून आऊट झाला आहे. पुजाराची 2019 साली 46.03 सरासरी ही 2021 मध्ये 12  इनिंगनंतर ती 30.33 वर घसरली आहे. पुजाराचा 2019 मधील 51.52 चा स्ट्राईक रेट हा 2021 मध्ये 31.59 इतका घसरला आहे. त्यामुळे इंग्लंड सीरिजमध्ये पुजाराला वगळण्याचा विचार झाला तर तिसऱ्या क्रमांकावर राहुल हा उपयुक्त पर्याय टीम इंडियाकडे (KL Rahul Should Play) आहे.

WTC Final 2021: टीम इंडियाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं

राहुल फॉर्मात

कोणत्याही खेळाडूची निवड होण्यासाठी त्याचा अलिकडचा फॉर्म हा सर्वात निर्णायक घटक असतो. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित होण्यापूर्वी राहुलनं 7 मॅचमध्ये 66. 20 च्या सरासरीनं 331 रन काढले होते. तसंच इंग्लंड विरुद्धच्ये वन-डे मालिकेतही राहुलनं एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे.

राहुलचा हा फॉर्म टेस्ट सीरिजमध्ये वापरण्याची गरज आहे. न्यूझीलंडची फायनल गमावल्यानंतर इंग्लंड विरुद्धची सीरिज जिंकणे हे टीम इंडियाचा लौकिक राखण्यासाठी आवश्यक आहे. या सीरिजपासून पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेचा पाया भक्कम करण्यासाठी के.एल. राहुलचा टीममध्ये समावेश (KL Rahul Should Play) आवश्यक आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: