फोटो – सिफी डॉट कॉम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2021) पराभूत झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल जखमी (Shumban Gill Injured) झाला आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पतौडी कप (Pataudi Cup) स्पर्धेतील सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही.

क्रिकबझ’ नं दिलेल्या वृत्तानुसार 21 वर्षांच्या गिलच्या पायला दुखापत झाली आहे. या दुखापतीचं नेमक स्वरुप अजून कळालेलं नाही. पण, ही दुखापत यापूर्वीच झाली असून ती आता बळावली असल्यानं गिल इंग्लंड विरुद्धच्या सुरुवातीच्या टेस्ट खेळू शकणार नाही. या दुखापतीनंतरही गिल टीम इंडियासोबतच इंग्लंडमध्ये थांबणार आहे. तो टेस्ट सीरिजच्या शेवटच्या टप्प्यात फिट होईल अशी आशा आहे.

ऑस्ट्रेलियात यशस्वी पदार्पण

शुभमन गिलनं मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये यशस्वी पदार्पण केले. ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. गिलनं त्या टेस्टच्या पाचव्या दिवशी आक्रमक 91 रनची खेळी केली होती. गिलनं एकूण आठ टेस्टमध्ये 31.84 च्या सरासरीनं 414 रन काढले आहेत. यामध्ये तीन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) गिलनं काही चांगल्या ओपनिंग पार्टनरशिप केल्या आहेत. त्यामुळे परदेशातील टेस्टमध्ये टीम इंडियाला चांगली ओपनिंग जोडी मिळाली असं मानलं जात होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये गिलनं पहिल्या इनिंगमध्ये 28 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 8 रन काढले होते. गिलनं फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये रॉस टेलरचा (Ross Taylor) सुंदर कॅच पकडला होता. आयसीसीनंही त्याची विशेष दखल घेतली होती.

गिलच्या जागी कोण खेळणार?

शुभमन गिल जखमी झाल्यानं (Shumban Gill Injured) टीम इंडियाकडे दोन पर्याय आहेत. यामधील पहिला पर्याय आहे मयांक अग्रवाल (Mayank Agarwal). मयांकनं गिल प्रमाणेच मेलबर्न टेस्टमध्ये पण 2018 साली पदार्पण केले आहे. त्याने 14 टेस्टमध्ये 45.73 च्या सरासरीने 1052 रन काढले आहेत. त्यामध्ये 3 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या टप्प्यात टीम इंडियाच्या यशात मयांकचे मोलाचे योगदान होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानं त्याला टीममधील जागा गमवावी लागली. तो यापूर्वी ब्रिस्बेन टेस्टमध्ये हनुमा विहारी (Hanuma Vihari)जखमी झाल्यानं मिडल ऑर्डरमध्ये खेळला होता.  

राहुल द्रविडच्या गावातील सेहवागला कन्फर्म जागेची प्रतीक्षा

दुसरा दावेदार

मयांक अग्रवालच्या कर्नाटक आणि पंजाब टीममधील सहकारी केएल राहुल (KL Rahul) हा शुभमन गिल जखमी झाल्यामुळे (Shumban Gill Injured) निर्माण झालेल्या जागेचा दुसरा दावेदार आहे. राहुलनं 36 टेस्टमध्ये 5 सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरीसह 2006 रन काढले आहेत.

Explained: इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये राहुलला संधी मिळायला हवी कारण…

राहुलनं टेस्टमधील सर्व सेंच्युरी या ओपनिंग बॅट्समन म्हणून बनावल्या आहेत. यामध्ये टीम इंडियानं यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळलेल्या शेवटच्या टेस्टमधील 149 रनचा समावेश आहे. राहुल 2019 साली वेस्ट इंडिज दौऱ्यात शेवटची टेस्ट खेळला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्टच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तर शेवटची टेस्ट 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: