भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या टेस्टपूर्वीच निवड समिती विरुद्ध कॅप्टन (Selection Committee vs Captain)  यांच्यात वाद सुरू झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीममधील रिझर्व ओपनिंग बॅट्समन अभिमन्य इश्वरनच्या (Abhimanyu Easwaran) निवडीवरुन हा वाद आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या निवडीवर खूश नाही, असं वृत्त आहे. तर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात निवड समिती आणि कॅप्टन यांच्यात वाद होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही.

विजय मर्चंट यांचा आदेश

1960 च्या दशकाच्या शेवटी बंगालच्या टीममध्ये रुजी जीजाभाई हे विकेट किपर होते. त्यांची बॅटींगमधील सरासरी 10.46 होती. 1971 साली वेस्ट इंडिजवर जाणाऱ्या टीममध्ये अतिरिक्त विकेट किपरची जागा रिकामी होती. जीजाभाई यांच्या निवडीसाठी निवड समितीचे तत्कलीन अध्यत्र विजय मर्चंट (Vijay Merchant) आग्रही होते.

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी पूर्व भारताच्या मॅचमध्ये दलजीत सिंह टीमचे विकेट किपर होते. पण विजय मर्चंटने टीमचा कॅप्टन रमेश सक्सेनाला बोलावून जीजाभाईला विकेट किपर म्हणून खेळवण्याचा आदेश दिला. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज व्यक्ती असलेल्या विजय मर्चंटचा आदेश रमेश सक्सेनाला टाळता आला नाही. मर्चंट यांच्या आग्रहाला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील टीम इंडियाचा कॅप्टन अजित वाडेकर (Ajit Wadekar) देखील नकार देऊ शकले नाहीत. जीजाभाई यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली. टीम इंडियाकडून तो त्यांचा पहिला आणि शेवटचा दौरा ठरला.  

टीम इंडियानं पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये बोलवण्याची घाई करू नये कारण…

कपिल देवने मनोज प्रभाकरला वगळले

1979 साली इंग्लंड दौऱ्यावर बंगालचे माजी कॅप्टन संबरन बॅनर्जी यांची निवड पक्की मानली जात होती. त्यावेळी कॅप्टन व्यंकटराघवन यांनी त्यांच्या तामिळनाडू प्रांतामधील भरत रेड्डीच्या नावाचा आग्रह (Selection Committee vs Captain)  केला. निवड समितीनं अखेर कॅप्टनच्या मताला मान दिला.

इंग्लंडमध्ये 1986 साली गेलेल्या टीममध्ये मनोज प्रभाकरचा (Manoj Prabhakar) समावेश होता. पण प्रभाकर टेस्ट खेळण्यासाठी तयार नाही, असं त्या टीमचा कॅप्टन कपिल देवचं मत होतं. कपिलच्या आग्रहामुळे त्या टीममध्ये प्रभाकरच्या जागी मदनलाल यांचा ऐनवेळी समावेश करण्यात आला. मदनलाल यांनी त्यावेळी टेस्ट क्रिकेटमधून जवळपास रिटायरमेंट घेतली होती, आणि ते इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळत होते.

गांगुलीच्या निवडीवर वाद

बंगालचे माजी कॅप्टन संबरन बॅनर्जी यांची 1979 साली कॅप्टनच्या हट्टामुळे टीम इंडियात निवड झाली नाही. 1996 साली इंग्लंड दौऱ्याची टीम निवडताना त्यांनी एका खेळाडूसाठी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीन आणि कोच संदीप पाटील यांचा विरोध (Selection Committee vs Captain) यांच्यात मोडून काढला. त्या दौऱ्यावर सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) निवड करण्यासाठी अझर आणि पाटील तयार नव्हते. बॅनर्जी यांनी निवड समितीचे तत्कालिन अध्यक्ष गुंडप्पा विश्वनाथ यांचे गांगुलीसाठी मन वळवले.

VIDEO : लॉर्ड्स टेस्टमध्ये घडला इतिहास, गांगुलीने झळकावली ऐतिहासिक सेंच्युरी

सचिनला दिला भलताच जेपी

सहारा कप 1997 च्या टीममध्ये तत्कालिन कॅप्टन सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मध्य प्रदेशचा ऑल राऊंडर जयप्रकाश (जेपी) यादव हवा होता. निवड समितीनं या मागणीकडे दुर्लक्ष करत उत्तर प्रदेशच्या ज्योती प्रकाश (जेपी) यादवची निवड केली.ज्योती प्रकाश यादवला टीम इंडियाकडून एकदाही संधी मिळाली नाही.

गांगुलीच्या आग्रहामुळे घडला इतिहास

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 साली झालेल्या ऐतिहासिक टेस्ट सीरिजसाठी शरणदीप सिंगला संधी देण्याचे निवड समितीने ठरवले होते. सौरव गांगुली हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) नावावर ठाम (Selection Committee vs Captain)  यांच्यात होता. अखेर निवड समितीनं हरभजनची निवड केली. पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे.

धोनीला झाली मित्राची आठवण

2011 साली इंग्लंड दौऱ्यात खराब कामगिमुळे अडचणीत आलेल्या टीम इंडियाला सावरण्यासाठी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) त्याचा खास मित्र आर.पी. सिंगची (RP Singh) आठवण झाली. आरपी तेव्हा मयामीमध्ये सुट्टीचा आनंद घेत होता. तो मयामीतून थेट इंग्लंडमध्ये गेला. आरपीला त्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यानंतर त्याची पुन्हा कधीही टेस्ट टीममध्ये निवड झाली नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: