फोटो – ट्विटर

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल (Shubman Gill) याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आता जवळपास संपूर्ण इंग्लंड दौरा खेळणार नाही. गिलचा पर्याय म्हणून टीम मॅनेजमेंट पृथ्वी शॉला (Pritthvi Shaw) इंग्लंडमध्ये बोलवण्याचा विचार करत आहे, असं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. पृथ्वीला इंग्लंडमध्ये बोलवण्याचा निर्णय (Prithvi Shaw In England) हा टीमसोबतच त्याच्या करियरला देखील घातक ठरु शकतो.

टीममधील खेळाडूंवर परिणाम

टीम इंडियाकडे केएल राहुल (KL Rahul) आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) हे दोन पर्याय सध्या इंग्लंडमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Easwaran) हा स्टँटबाय खेळाडू देखील उपलब्ध आहे. यापैकी अभिमन्यूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही, पण त्याला ठोस विचार करुनच निवड समितीनं इंग्लंडमध्ये पाठवले आहे.

राहुल आणि मयांक हे दोघंही अनुभवी खेळाडू आहेत. राहुलनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजारपेक्षा जास्त रन काढले आहेत. टीम इंडियाच्या इंग्लंडमध्ये खेळलेल्या शेवटच्या टेस्टमध्ये राहुलनं 149 रनची खेळी केली होती. चार वेगवेगळ्या खंडामध्ये राहुलनं ओपनर म्हणून सेंच्युरी झळकावली आहे. मयांक अग्रवाल देखील अनुभवी खेळाडू असून त्याने देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) सुरुवातीच्या टप्प्यात चांगली कामगिरी केली होती.

 टीम मॅनेजमेंटनं तरीही पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये बोलावल्यास (Prithvi Shaw In England) या खेळाडूंच्या मनस्थितीवर परिणाम होऊ शकते. टीममधील वातावरण यामुळे बिघडू शकते. टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनी हा मुद्दा मांडला आहे.  

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन जखमी, इंग्लंड विरुद्ध कुणाला मिळणार संधी?

पृथ्वी शॉ तयार आहे का?

पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्ये सपशेल अपयशी ठरला होता. त्या टेस्टमध्ये त्याने 0 आणि 4 रन काढले होते. त्यानंतर झालेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत त्याने 800 पेक्षा जास्त रन काढले. आयपीएल स्पर्धेच्या पूर्वार्धात (IPL 2021) तो फॉर्मात होता. हे खरं आहे.

असं असलं तरी, पृथ्वी टेस्ट क्रिकेट अद्याप खेळलेला नाही. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयनं यावर्षीची रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द केली. त्यामुळे पृथ्वीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये  एक दिवसापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या स्पर्धेत बॅटींग करायला मिळालेली नाही. पृथ्वी शॉमध्ये गुणवत्ता आहे. त्याबद्दल कुणालाही संशय नाही. पण अपुऱ्या तयारीच्या अभावी त्याला थेट इंग्लंडमध्ये पाठवणे (Prithvi Shaw In England) धोकादायक ठरु शकते. इंग्लंडमधील स्विंगला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर पृथ्वी अपयशी ठरला तर त्याच्या करियरला यामुळे सेटबॅक बसू शकतो.

16 मॅच 1135 रन तरीही पृथ्वी शॉ टीम इंडियात नाही कारण…

आणखी एकदा क्वारंटाईन

पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये बोलवणे योग्य ठरणार नाही याचं आणखी एक कारण मानसिक आहे. पृथ्वी सध्या श्रीलंकेत आहे. या दौऱ्यापूर्वी तो मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन होता. त्यानंतर त्याने श्रीलंकेत आवश्यक क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे.

पृथ्वीला श्रीलंकेहून इंग्लंडमध्ये बोलावल्यास त्याला पुन्हा एकदा क्वारंटाईन राहावे लागेल. सतत क्वारंटाईन आणि बायो-बबलमध्ये राहण्याचा मानसिक परिणाम होतो, असे अनेक क्रिकेटपटू तसेच खेळाडूंनी सांगितले आहे. 21 वर्षांच्या पृथ्वी शॉसाठी (Prithvi Shaw In England) देखील हा अनुभव त्रासदायक ठरु शकतो.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: