फोटो – ट्विटर, विस्डेन क्रिकेट

दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याचं टीम इंडियाचं (Team India) स्वप्न एक टेस्ट पुढे गेले आहे. सेंच्युरिनमध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकल्यानंतर जोहान्सबर्गमध्ये पहिल्यांदाच टेस्ट हरण्याचा रेकॉर्ड भारतीय टीमच्या नावावर झाला. तीन टेस्टच्या सीरिजमधील दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa) दक्षिण आफ्रिकेनं भारतीय टीमचा 7 विकेट्सनं पराभव केला आहे. आता या सीरिजचा निर्णय केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये होईल. टीम इंडिया जोहान्सबर्ग टेस्ट हरण्याची 5 मुख्य कारणं (Why India Lost Johannesburg Test) आहेत.

पहिल्या इनिंगमध्ये अपयश

विदेशात टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये चांगला स्कोअर करणे हे आवश्यक असते. सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 327 रन करत आफ्रिकेसमोर आव्हानात्मक स्कोअर उभा केला. त्यामुळे आफ्रिकेची टीम पहिल्या इनिंगपासून बॅकफुटवर गेली. जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 202 रनवर ऑल आऊट झाली. या टेस्टच्या पहिल्या दिवशी आणि पहिल्या इनिंगमध्येच टीम इंडियाच्या पराभवाचे पहिले कारण घडले.

एकत्र विकेट्स गमावल्या

टीम इंडिया जोहान्सबर्ग टेस्टमध्ये तिसऱ्या दिवसापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये होती. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 111 रनची पार्टनरशिप केली. दोघांनीही हाफ सेंच्युरी झळकावली. त्यावेळी टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती.

भारतीय टीमनं त्यानंतर कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) एकाच स्पेलमध्ये विकेट्स गमावल्या. रबाडाने सलग तीन ओव्हर्समध्ये रहाणे, पुजारा आणि पंत या तीन बॅटर्सना आऊट करत मॅचचं पारडं आफ्रिकेकडं झुकवलं. ऋषभ पंत खराब शॉट्स मारत शून्यावर आऊट झाला. तिसऱ्या दिवशी तीन विकेट्स एकत्र गमावल्यानं दिवसभर खेळून मोठी आघाडी घेण्याचे टीम इंडियाचे धोरण (Why India Lost Johannesburg Test) फसले.

पुजारा-रहाणेच्या चर्चेत पंत करतोय पचका, द्रविडचं टेन्शन वाढलं

अनफिट सिराज

टीम इंडियाच्या परदेशातील विजयात नेहमीच मोहम्मद सिराजचच्या (Mohammed Siraj) बॉलिंगचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. सिराजनं त्याच्या भेदक बॉलिंगनं महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेत टीम इंडियाला मॅचमध्ये आणले आहे. सिराजला पहिल्या इनिंगमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे त्यानं या टेस्टमध्ये जास्त बॉलिंग केली नाही. त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 6 ओव्हर्स टाकल्या, याचा टीम इंडियाला फटका बसला.

बुमराह फेल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर (WTC Final) जोहान्सबर्ग टेस्टमध्ये बुमराह फेल गेला. त्यामुळे या टेस्टचा निकालही फायनल प्रमाणेच टीम इंडियाच्या विरोधात गेला. बुमराहवर राहुलची मोठी अपेक्षा होती. त्यानंही विकेट घेण्यासाठी आक्रमक बॉलिंग केली. पण, बुमराहनं 4 च्या रनरेटनं रन दिले. प्रमुख अस्त्र फेल गेल्याचा परिणाम टीम इंडियाच्या (Why India Lost Johannesburg Test) कामगिराव

आफ्रिकन बॅटरचा ‘एल्गार’

दक्षिण आफ्रिकेच्या बॅटर्सनी चौथ्या इनिंगमध्ये आव्हामात्मक परिस्थितीमध्ये लढा देत विजय खेचून आणला. कॅप्टन डीन एल्गारनं (Dean Elgar) आघाडीवर राहात टीमचे नेतृत्त्व केले. तिसऱ्या दिवशी अंगावर बॉल झेलणाऱ्या एल्गारनं चौथ्या दिवशी वेगाने रन जमवले. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सर्व बॅटरसोबत निर्णयाक पार्टनरशिप केली. एल्गारची सेंच्युरी काही पूर्ण झाली नाही, पण त्याची बॅटींग आणि त्याच्या टीमनं मिळवलेल्या यशाची चकाकी ही 100 नंबरी सोन्यापेक्षा कमी (Why India Lost Johannesburg Test) नव्हती.

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयात 4 जणांचा मोठा अडथळा, घरच्या मैदानात वाढवणार डोकेदुखी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: