फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये तेच घडले जे यापूर्वीच्या काही सीरिजमध्ये झाले आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahnae) हे दोघं जण फेल गेले. केपटाऊन टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाला सर्वाधिक गरज होती, तेव्हा हे दोघेही दोन अंकी रन देखील करू शकले नाहीत. अजिंक्यने 3 टेस्टमध्ये 22.66 च्या सरासरीनं 136 रन केले. तर पुजाराची कामगिरी आणखी खराब झाली आहे. त्याने 3 टेस्टमध्ये 20.66 च्या सरासरीनं 124 रन केले आहे. सातत्याने फ्लॉप होत असलेल्या या दोघांवरील मॅनेजमेंटचे प्रेम कायम आहे. या प्रेमामुळे 4 भारतीय बॅटरचे वय वाढत असून ते सर्व जण संधीची वाट पाहात (4 Batters in waiting) म्हातारे होत आहेत.

हनुमा विहारी

बॅटींग ऑर्डरमधील 1 ते 7 पैकी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची क्षमता असलेल्या मोजक्या खेळाडूमध्ये हनुमा विहारीचा (Hanuma Vihari) समावेश होतो. हनुमा विहारीनं आजवरच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये फक्त 1 टेस्टचा अपवाद वगळता सर्व टेस्ट विदेशात खेळल्या आहेत. त्याला नेहमीच अवघड परिस्थितीमध्ये टीम इंडियाने पुढे केले आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि लढण्याची जिद्द त्याने दाखवली आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियातील पिचवर तो यशस्वी देखील ठरला आहे. सिडनी टेस्टमध्ये वर्षभरापूर्वी विहारीनं दिलेला लढा कोणताही भारतीय फॅन विसरू शकणार नाही.

विहारीला या सीरिजच्या तयारीचं कारण देत इंडिया A टीमसोबत आफ्रिकेत सर्वात आधी पाठवण्यात आले. त्या सीरिजमध्ये तो चांगलं खेळला. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली. त्यामधील दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने एकाकी लढा दिला. विहारी आता 28 वर्षांचा आहे. त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी अधिक संधी देण्याची हीच वेळ आहे. या गुंतवणुकीचा टीम इंडियाला भविष्यात फायदा होईल. पण पुजारा-रहाणेच्या प्रेमात मॅनेजमेंट त्याच्या कारकिर्दीमधील मौल्यवान वेळ वाया (4 Batters in waiting) घालवत आहे.

श्रेयस अय्यर

मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्ये पदार्पणातील इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली. त्यानं कानपूरमध्ये दोन्ही इनिंगमध्ये सर्वाधिक रन केले. त्यानंतरही त्याला दक्षिण आफ्रिकेतील संपूर्ण सीरिजमध्ये बेंचवर बसावे लागले.

श्रेयसचा फर्स्ट क्लासमधील रेकॉर्ड देखील दमदार आहे. त्याने आजवर 56 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 52.10 च्या सरासरीने 4794 रन काढले आहेत. यामध्ये 13 सेंच्युरी आणि 24 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. श्रेयस सध्या 27 वर्षांचा आहे. तो देखील टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळावी म्हणून रांगेत प्रतीक्षा करत (4 Batters in waiting) आहे.

वर्ष एक फोटो दाखवून श्रेयसला दिली वडिलांनी प्रेरणा, अखेर झाली स्वप्नपूर्ती

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 44.01 च्या सरासरीने 5326 रन केले आहेत. यामध्ये 14 सेंच्युरी आणि 26 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याची ही आकडेवारी तो टेस्ट क्रिकेटमध्येही यशस्वी होऊ शकतो, हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली होती. पण तो त्या दोन्ही सीरिज बेंचवर होता. त्यानंतर आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीम निवडीत त्याचा विचार झाला नाही. सूर्यकुमार सध्या 31 वर्षांचा आहे. त्याला लवकर संधी मिळाली नाही तर टेस्ट क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न (4 Batters in waiting) कधीही पूर्ण होणार नाही.

प्रियांक पांचाल

गुजरातचा प्रियांक पांचाल (Priyank Panchal) देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रन करत आहे.  त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आजवर 24 सेंच्युरी आणि 25 हाफ सेंच्युरी असून त्यानं 45.52 च्या सरासरीनं 7,011 रन काढले आहेत.

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी इंडिया A तिथे सीरिज खेळली. त्या टीममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. तरीही निवड समितीने प्रियांकला कॅप्टन केले होते. प्रियांकने त्याला संधी मिळालेल्या प्रत्येक सीरिजमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाल्यानंतर त्याचा ऐनवेळी टीममध्ये समावेश करण्यात आला. तो पुजाराचा योग्य वारसदार होऊ शकतो. प्रियांक सध्या 31 वर्षांचा आहे. पुजारा आणि रहाणेवरील प्रेमामुळे तो देखील म्हातारा (4 Batters in waiting) होत आहे.

टीम इंडियाकडे आहे पुजाराचा पर्याय, राहुल द्रविड करणार का आग्रह?

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: