फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे सीरिज नुकतीच संपली. या सीरिजमध्ये आफ्रिकेनं टीम इंडियाचा 3-0 असा संपूर्ण पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला हा विजय मोठी उभारी देणारा आहे. या विजयानंतर त्यांच्या टीममधील खेळाडू चांगलेच आनंदी आहेत. ते हा आनंद सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. या सर्व खेळाडूंच्या आनंदात एक प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्याचं कारणही तितकंच खास आहे. त्या खेळाडूनं विजयानंतर चक्क जय श्रीराम (Jai Shree Ram) असे म्हणत रामनामाचा गजर केला आहे.

आफ्रिकेचा मेन खेळाडू

दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा फक्त दुसरा खेळाडू असलेल्या केशव महाराजनं (Keshav Maharaj)  त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ‘जय श्रीराम’ असा उल्लेख केला आहे. महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा मुख्य स्पिनर आहे.

महाराजने या वन-डे सीरिजमध्ये दोन वेळा विराट कोहलीला (Virat Kohli) आऊट केले. दुसऱ्या वन-डेमध्ये त्यानं कोहलीला शून्यावर परतवले. तर तिसऱ्या वन-डेमध्ये त्याला निर्णायक क्षणी आऊट करत मॅचचं चित्र बदललं होतं. त्याचप्रमाणे पहिल्या वन-डेमध्ये त्याने टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन करणाऱ्या शिखर धवनची (Shikhar Dhawan) विकेट घेतली. महाराजनं संपूर्ण सीरिजमध्ये फक्त 4.58 च्या इकोनॉमी रेटनं रन दिले.

काय आहे पोस्ट?

‘काय सीरिज होती. मला या टीमचा अभिमान आहे. या टीमनं मोठी मजल मारली आहे. आता पुढील सीरिजची तयारी करण्याची वेळ आहे. जय श्रीराम.’ या शब्दात महाराजनं या विजयाचा आनंद व्यक्त करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली असून जी सध्या वेगानं व्हायरल (Jai Shree Ram)  होत आहे.

अनेक रेकॉर्डचा मानकरी

दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. या टीममधील प्रमुख खेळाडूंची निवृत्ती आणि आफ्रिका बोर्डाच्या कारभाराचा फटका टीमला बसला आहे. या कसोटीच्या काळात तीन्ही प्रकारात टीममध्ये असलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये महाराजचा समावेश होतो. तो दक्षिण आफ्रिकेचा मुख्य स्पिनर आहे.

महाराजची बॅटींग देखील उपयुक्त आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एकाच ओव्हरमध्ये सर्वात जास्त 28 रन करण्याचा संयुक्त रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. इंग्लंड विरुद्ध जो रूटच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. आशिया खंडात एका इनिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा आफ्रिकन बॉलर हा रेकॉर्डही महाराजच्या नावावर (Jai Shree Ram) आहे. त्याचबरोबर पहिल्याच T20 इंटरनॅशनलमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टीमची कॅप्टनसी देखील केली आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील दुष्टचक्र कधी सुटणार?

उत्तर प्रदेश कनेक्शन

केशव महाराजचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये झाला. त्याच्या कुटुंबाचे उत्तर प्रदेशशी कनेक्शन आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर हे महाराजचे मुळ गाव. त्याचे पूर्वज 19 व्या शतकात आफ्रिकेत गेले. त्यानंतरही त्यांची हिंदू धर्माशी असलेली नाळ कायम आहे.

मारूती भक्त असलेल्या महाराजच्या घरातच (Jai Shree Ram) क्रिकेट आहे. त्याचे वडिल आणि आजोबा दक्षिण आफ्रिकेतील फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळले आहेत

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: