फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या वन-डेमध्ये विराट कोहलीकडं (Virat Kohli) सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. विराट बऱ्याच कालावधीनंतर एक खेळाडू म्हणून या मॅचमध्ये खेळला. त्यानं T20 आणि टेस्ट टीमची कॅप्टनसी स्वत:हून सोडली आहे. तर वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून त्याला हटवण्यात आले आहे. विराट कोहली या नव्या इनिंगमध्येही जुन्या पद्धतीनेच आक्रमक दिसला. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन तेम्बा बावूमाशी त्याने मैदानात वाद (Virat vs Bavuma) घातला.

नेमके काय घडले?

दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगमधील 36 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. भारताकडून युजवेंद्र चहल ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर बावूमाने कव्हर्सला शॉट लगावला. त्या ठिकाणी विराट फिल्डिंग करत होता. विराटने तातडीने तो बॉल अडवत लगेच विकेट किपर ऋषभ पंतकडे थ्रो केला. विराटचा थ्रो बावूमाच्या अगदी जवळून गेला. त्यावेळी बावूमा  काही तरी म्हणाला विराटनं त्याला त्याच पद्धतीनं आक्रमक उत्तर दिलं.  

बावूमाची सेंच्युरी

तेम्बा बावूमानं टेस्ट सीरिजमधील फॉर्म वन-डे मॅचमध्येही कायम ठेवला. विराटशी झालेल्या वादानंतरही (Virat vs Bavuma) त्याने लक्ष विचलित होऊ दिलं नाही. त्याने वन-डे कारकिर्दीमधील दुसरी सेंच्युरी  झळकावली. बावूमाने 143 बॉलमध्ये 110 रन काढले. त्याचबरोबर रासी व्हेन डर डुसेनचा (Rassie van der Dussen) सोबत चौथ्या विकेटसाठी 204 रनची पार्टनरशिप केली. रासीने 96 बॉलमध्ये नाबाद 129 रन काढले. त्याने या खेळीत 4 सिक्स आणि 9 फोर लगावले. या दोघांच्या पार्टनरशिपमुळे दक्षिण आफ्रिकेनं 50 ओव्हर्समध्ये 4 आऊट 296 रन काढले.

भारतीय बॉलर्ससाठी दिवस साधारणच गेला. बुमराहला 2 तर अश्विनला 1 विकेट मिळाली. भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल यांना एकही विकेट मिळाली नाही. यामधील भुवनेश्वर आणि ठाकूर हे महागडे देखील ठरले. त्यामुळे दुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियाला बॉलिंगमध्ये बदल करावे लागणार आहेत.

IND vs SA: टीम निवडीचं पंचवार्षिक दुखणं, द्रविड कधी देणार कडू गोळी?

भारतीय इनिंग गडगडली

टीम इंडियाला विजयासाठी 297 रनचे आव्हान होते. कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) 12 रन काढून झटपट आऊट झाला. त्यांनतर शिखर धवन आणि विराट कोहली या अनुभवी जोडीनं चांगली पार्टनरशिप केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 रन जोडले. त्यानंतर मात्र सेट झाल्यावर हे दोघेही आऊट झाले. धवन (79) आणि विराट (51) रन काढून आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची मिडल ऑर्डर (Virat vs Bavuma) गडगडली.

श्रेयस अय्यर (17), ऋषभ पंत (16) तसेच व्यंकटेश अय्यर (2) रन काढून आऊट झाले. त्यानंतर अश्विन आणि भुवनेश्वर देखील फार काळ तग धरू शकले नाहीत. शार्दुल ठाकूरनं शेवटी फटकेबाजी करत प्रतिकार केला. पण त्याचा प्रतिकार अखेर अपुरा ठरला. दक्षिण आफ्रिकेनं पहिली वन-डे 31 रनने जिंकली. तीन वन-डे मॅचच्या सीरिजमधील दुसरी वन-डे 21 तर तिसरी वन-डे 23 जानेवारी रोजी होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: