फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियाची विदेशातील टेस्ट सीरिजमध्ये सुरुवात अडखळती होते, अशी परंपरा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa) ही परंपरा मोडली आहे. टीम इंडियानं केएल राहुलच्या दमदार सेंच्युरीमुळे (KL Rahul Century in Centurion) पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 272 रन काढले आहेत. दिवसभराचा खेळ संपला तेव्हा राहुल 122 तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahnae) 40 रन काढून खेळत होते.

सर्व खंडात राहुलची पताका

केएल राहुलनं सेंच्युरियन टेस्टमध्ये त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील 7 वी सेंच्युरी झळकावली. फास्ट बॉलर्सना मदत करणाऱ्या ग्रीन पीचवर विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) सोबत पहिल्या विकेटसाठी 117 रनची पार्टनरशिप केली. 2010 नंतर पहिल्यांदाच भारतीय ओपनर्सनी दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरी पार्टनरशिप केली आहे.

मयंक आऊट झाल्यानंतर पुजारा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर राहुलने विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांसोबतही 82 रन जोडले. या खेळीदरम्यान त्याने टेस्ट क्रिकेटमधील 7 वी सेंच्युरी (KL Rahul Century in Centurion) 218 बॉलमध्ये 14 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं झळकावली.

राहुल या सेंच्युरीसह तो खेळलेल्या सर्व खंडात सेंच्युरी झळकावणारा पहिला भारतीय ओपनर बनला आहे. राहुलनं आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आता आफ्रिका या पाचही खंडात सेंच्युरी झळकावली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरी झळकावणारा तो पहिला भारतीय ओपनर आहे.

वन-डे पदार्पणात सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय

14 वर्षांची प्रतीक्षा संपवली

केएल राहुलचं आशिया खंडाच्या बाहेर ही 5 वी सेंच्युरी आहे. याबाबतीत त्याने वीरेंद्र सेहवागला आता मागे टाकलं आहे. सेहवागच्या आशिया बाहेर चार सेंच्युरी आहेत. त्याचबरोबर त्याच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील 14 पैकी 11 सेंच्युरी या भारताबाहेर आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सेंच्युरीयनच्या पिचवर सेंच्युरी झळकावणारा राहुल हा पहिला भारतीय ओपनर आहे. तसंच वासिम जाफरनंतर (Wasim Jaffer) दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरी झळकावणारा (KL Rahul Century in Centurion) तो पहिला भारतीय आहे. जाफरनं 2007 साली केपटाऊन टेस्टमध्ये ही कामगिरी केली होती. राहुलने तब्बल 14 वर्षांनी ही प्रतीक्षा संपवली आहे.

टेस्ट खेळण्याची नव्हती आशा

राहुल 2021 मध्ये फॉर्मात आहे. त्यानं या वर्षातील शेवटच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test) सेंच्युरी झळकावत हा फॉर्म कायम ठेवला आहे. पण, राहुलला वर्षभरापूर्वी आपण टेस्ट क्रिकेट पुन्हा खेळू असं वाटत नव्हतं. त्याने टेस्टमध्ये पुन्हा खेळायला मिळेल ही आशा सोडून दिली होती.

या टेस्टपूर्वी ‘बीसीसीआय टीव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुलनं ही भावना व्यक्त केली आहे. ‘सहा-सात महिन्यांपूर्वी किंवा वर्षभरापूर्वी पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळायला मिळेल असा कधीही विचारही केला नव्हता. पण परिस्थिती खूप वेगाने बदलली. त्यामुळे मी खूश आहे. बॉक्सिंग डे टेस्टबाबत माझ्या संमिश्र आठवणी आहेत.

3 भारतीय ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत केले दमदार पदार्पण

मी ऑस्ट्रेलियात याच टेस्टमधून पदार्पण केले. त्यानंतर खराब कामगिरीमुळे याच टेस्टमध्ये मला टीममधील जागा गमवावी लागली. मला वाटलं हाच माझा शेवट आहे. माझा आता खेळाबद्दलची भूमिका खूप बदलली आहे. 2014 साली मी पदार्पण केले, आणि 2018 साली मी ज्या पद्धतीनं खेळलो त्यामधून खूप काही शिकलो.’ असे राहुलनं या मुलाखतीमध्ये (KL Rahul Century in Centurion) सांगितले होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: