फोटो – ट्विटर, आयसीसी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्या सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसावर बॉलर्सनी वर्चस्व गाजवलं. दिवसभराच्या खेळात एकूण 18 विकेट्स गेल्या. यजमान टीमनं सकाळी केलेलं आक्रमण, टीम इंडियानं नंतरच्या सेशनमध्ये उलटवलं. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammed Shami)  टीम इंडियासाठी तिसऱ्या दिवशी हिरो ठरला. शमीनं आफ्रिकेच्या पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्स (Mohammed Shami 200 Wickets)  पूर्ण केल्या. तसंच नव्या रेकॉर्डचीही नोंद केली.

शमीचा ‘पंजा’ ठरला भारी!

क्रिकेट विश्वात SENA (South Africa, England, New Zealand, Australia) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपैकी आफ्रिकेत शमीचा रेकॉर्ड सर्वात चांगला आहे. सेंच्युरियन टेस्ट सुरू होण्यापूर्वी त्याची आफ्रिकेतील सरासरी 20.91 इतकी होती. टीम इंडियाची इनिंग अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आल्यानं शमीकडून मोठी अपेक्षा होती. अनुभवी बॉलरनं टीमला निराश केले नाही.

शमीनं लंचनंतर तिसऱ्याच बॉलरवर पीटरसनला आऊट करत इनिंगमधील पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्यानं सातत्याने बॅटर्सची परीक्षा पाहणारे बॉल टाकले. यामधून त्याला दुसरं यश मिळालं. आफ्रिकेचं भावी आशास्थान असलेल्या एडेन मार्करमला (Aiden Markram)  शमीनं 13 रनवर आऊट (Mohammed Shami 200 Wickets) केले.

Explained: मोहम्मद शमी कसा बनला टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड

शमी एवढ्यावरच थांबला नाही. टेम्बा बावूमा आणि क्विंटन डी कॉकची जमलेली जोडी शार्दूल ठाकूरनं (Shardul Thakur) तोडली. त्यानंतर शमीनं 4 ओव्हर्समध्ये वूआन मुल्डर आणि बावूमाला आऊट करत आफ्रिकेला गुडघे टेकायला लावले. आफ्रिकेकडून फक्त बावूमानं हाफ सेंच्युरी झळकावत 52 रन केले.

आफ्रिका आघाडी घेणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले होते. त्यानंतर कागिसो रबाडानं (Kagiso Rabada) जेन्सन सोबत टीम इंडियाची आघाडी कमी करण्यासाठी संघर्ष सुरू केला होता. त्यावेळी शमीनं रबाडाला आऊट करत इनिंगमधील पाचवी विकेट घेतली. त्याचबरोबर आफ्रिका 200 रनचा टप्पा ओलांडणार नाही, हे निश्चित (Mohammed Shami 200 Wickets) केले.

शमीचे रेकॉर्ड्स

शमीच्या 5 विकेट्समुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 130 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली. त्याचबरोबर शमीनं टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा देखील ओलांडला. हा टप्पा ओलांडणारा शमी हा कपिल देव, इशांत शर्मा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांच्यानंतरचा पाचवा भारतीय फास्ट बॉलर बनला आहे.

शमीने 2013 साली वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या करिअरला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ आले. त्यानंततरही त्याने 54 टेस्टमध्ये ही कामगिरी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे शमीनं भारताचा सर्वात यशस्वी ऑफ स्पिनर आर. अश्विनपेक्षा कमी बॉलमध्ये 200 विकेट्सचा टप्पा (Mohammed Shami 200 Wickets) ओलांडला आहे.

शमीनं दक्षिण आफ्रिकेत एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. भारतीय बॉलर्समध्ये आफ्रिकेत जवागल श्रीनाथनं सर्वाधिक 3 वेळा ही कमगिरी केली आहे. त्याचबरोबर शमीला बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी या वर्षात एकदाही एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी करता आली नव्हती. त्याने वर्षातील शेवटच्या टेस्टमध्ये ही कामगिरी  करत वर्ष वाया जाणार नाही, हे देखील निश्चित केले.

टीम इंडियाचा पहिला अस्सल ‘फास्ट’ बॉलर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: