फोटो – ट्विटर, आयसीसी

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कोणत्याही इनिंगची हल्ली दोन वैशिष्ट्य झाली आहेत. एक तो लवकर आऊट होऊन टीमला अडचणीत आणतो किंवा संकटकाळात त्याच्या पद्धतीनं खेळ करत टीमला अडचणीतून बाहेर काढतो. पहिल्या वन-डेमध्ये पंत आऊट झाल्यानंतर मॅच खऱ्या अर्थाने आफ्रिकेकडे झुकली. दुसऱ्या वन-डेमध्ये त्यानं टीमला अडचणीतून बाहेर काढले. पंतनं यावेळी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडचा 21 वर्ष जुना रेकॉर्ड (Pant Broke Dravid Record) मोडला. पण, त्याचवेळी एक चांगली संधी त्याच्या हातातून निसटली.

पंतने सोडवले

ऋषभ पंतची दुसऱ्या वन-डेमध्ये मैदानात एन्ट्री मोठ्या अडचणीच्या वेळी झाली. कॅप्टन राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली. राहुल आणि धवन जोडीनं सावध खेळी करत मोठ्या स्कोअरचा पाया रचण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी धवन 29 रन काढून आऊट झाला. धवनपाठोपाठ विराट कोहली (Virat Kohli) देखील परतला.

विराट कोहली 5 बॉलमध्ये एकही रन न काढता आऊट झाला. कॅप्टन पदाचे ओझे उतरल्यानंतर जुना विराट दिसेल या आशेनं मॅच पाहणाऱ्या सर्वांची यामुळे निराशा झाली. विराट पहिल्या वन-डे मध्ये हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर आऊट झाला होता. दुसऱ्या वन-डेमध्ये तो फक्त 5 बॉल मैदानात टिकला. विराट आऊट झाल्यानंतर टीमची अवस्था बिनबाद 63 वरून 2 आऊट 64 झाली होती. त्यावेळी पंत बॅटींगला आला.

पंतने पहिल्या बॉलपासून धोकादायक खेळ करत सर्वांच्या छातीचे ठोके वाढवले होते. पण, त्याच्या खेळानंच टीम इंडिया संकटातून बाहेर (Pant Broke Dravid Record) आली.

IND vs SA: केपटाऊनच्या खडतर परिस्थितीत पंतची सेंच्युरी,

द्रविडचा रेकॉर्ड मोडला पण…

ऋषभ पंतनं यावेळी राहुलच्या आधी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. वन-डे करिअरमधील चौथी हाफ सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी त्याने फक्त 43 बॉल घेतले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी राहुल सोबत 100 रनची पार्टनरशिप देखील पूर्ण केली.

पंतनं यावेळी दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही भारतीय विकेटकिपरकडून वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर केला. त्याने सध्याचे हेड कोच राहुल द्रविड यांचा 21 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. द्रविडने 2001 साली डरबनमध्ये 77 रनची खेळी केली होती. पंतने द्रविडला मागे (Pant Broke Dravid Record) टाकले. पण, वन-डे करिअरमधील पहिली सेंच्युरी झळकावण्याची संधी काही त्याला साधता आली नाही.

तरबेज शम्सीच्या बॉलिंगवर लाँग ऑनला सिक्स मारण्याच्या नादात तो 85 रन काढून आऊट झाला. पंतच्या करिअरमधील ही 20 वी वन-डे आहे. या कारकिर्दीमधील सर्वोच्च स्कोअर त्याने आऊट होण्यापूर्वी नोंदवला होता.

ठाकूर-अश्विनची झुंज

ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यानंतर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद 48 रनचा पार्टनरशिप केली. शार्दुल 48 तर अश्विन 25 रन काढून नाबाद राहिला. त्यांच्या योगदानामुळेच टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 6 आऊट 287 असा आव्हानात्मक स्कोअर उभा केला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: