फोटो – ट्विटर, क्रिकेट आफ्रिका

जोहान्सबर्गच्या मैदानावर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) दुसरी टेस्ट सुरू आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाची सुरूवात धक्कादायक झाली. विराट कोहली (Virat Kohli) पाठदुखीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यामुळे टीम इंडियाला टॉसपूर्वीच मोठा धक्का बसला. विराटच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा या टेस्टमध्ये कॅप्टन आहे. पहिल्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी दोन धक्के बसले. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे दोघं सलग बॉलवर आऊट झाले. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये कमबॅक करणाऱ्या डुआने ऑलिव्हरने (Duanne Olivier Comeback) त्यांना सलग बॉलवर आऊट केले.

रेकॉर्ड टीम इंडियाच्या बाजूने

जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड (Johannesburg Test Record) चांगला आहे. या मैदानावर टीम इंडिया अपराजित आहे. टीम इंडियाने या मैदानावर पाच टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी दोन टेस्ट जिंकल्या, तर तीन ड्रॉ राहिल्या आहेत.

2018 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात टीम इंडियाने मिळवलेला एकमेव विजय याच मैदानावरील आहे. फास्ट बॉलर्सच्या जीवावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 63 रनने पराभव केला होता.

हुकूमाचा एक्का

सेंच्युरीयन टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिका टीम चार फास्ट बॉलर आणि एका स्पिनरला घेऊन मैदानात उतरली होती. पण त्यात ऑलिव्हरचा समावेश नव्हता. आफ्रिकेला ही सीरिज वाचवण्यासाठी जोहान्सबर्ग टेस्टमध्ये पराभव चालणार नाही. त्यामुळेच कॅप्टन डिन एल्गार (Dean Elgar) 29 वर्षीय डुआने ऑलिव्हरला (Duanne Olivier Comeback) Playing 11 मध्ये संधी दिली.

सेंच्युरियन टेस्ट जिंकूनही टीम इंडियाचे नुकसान, विराट-द्रविडची वाढली डोकेदुखी

तीन टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी निवडलेल्या 21 सदस्यांच्या टीममध्ये त्याचा समावेश होता, मात्र तो पहिली टेस्ट खेळू शकला नव्हता. त्याला टीममध्ये स्थान न देण्यात आल्यामुळे आफ्रिकेच्या निवड समितीवर टीकाही झाली. परंतु त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने पहिल्या टेस्टमध्ये खेळवलं नाही, असे स्पष्टीकरण क्रिकेट साऊथ आफ्रिकेने (Cricket South Africa) दिले होते.

जबरदस्त रेकॉर्ड

2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध डेब्यू करणाऱ्या ऑलिव्हरचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. पहिल्याच टेस्टमध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.यापूर्वी खेळलेल्या 10 टेस्टमध्ये त्याच्या नावापुढे 48 विकेट्सची नोंद आहे. आपल्या छोट्याश्या टेस्ट करिअरमध्ये पाच विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने 3 वेळा आणि 10 विकेट्स घेण्याची कामगिरी एकदा केलीय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 125 मॅचमध्ये 502 विकेट्स घेतल्या आहेत.

डुआने ओलिवियर (Duanne Olivier Comeback) याने आपली अखेरची टेस्ट फेब्रुवारी 2019 ला खेळली होती. त्यानंतर त्याची टीममध्ये निवड झाली नाही. मधल्या काळात त्याने इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळले. परंतु एनरिक नॉर्खियाला (Anrich Nortje) दुखापत झाल्यामुळे आता तीन वर्षानंतर त्याची टीममध्ये निवड झाली. तो या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिरकेचा हुकुमाचा एक्का असेल असे मानले जात होते. ऑलिव्हरनं परत येताच पुजारा आणि रहाणेला आऊट करत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे. आता टीम इंडियाला ही टेस्ट जिंकायची असेल तर ऑलिव्हरला जपून खेळावं लागणार आहे.

डी कॉकच्या निवृत्तीवर कॅप्टन आणि कोचची पहिली प्रतिक्रिया

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: