फोटो – ट्विटर, बीसीसीआय

जोहान्सबर्ग टेस्ट (India vs South Africa) रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. पहिली इनिंगमध्ये 202 रनमध्ये आऊट झालेल्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 229 रनमध्ये ऑलआऊट करत मोठी आघाडी घेऊ दिली नाही. त्यानंतर दिवसअखेर 2 विकेट्सच्या मोबदल्यात 85 रन करत 58 धावांची आघाडी घेतली. पहिल्या इनिंगमध्ये झटपट आऊट झालेला चेतेश्वर पुजारा (35) आणि अजिंक्य रहाणे (11) मैदानावर आहेत. टीम इंडियाची मदार या दोघांवर असून टेस्ट करिअर वाचवण्यासाठी दोघांनाही निर्णायक इनिंग खेळावी लागेल. तत्पूर्वी टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Rise of Lord Shardul) याने जोहान्सबर्गमध्ये अविस्मरणीय स्पेल टाकला.

विकेट्सचा ‘सत्ता’

पहिल्या टेस्टमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे दुसऱ्या टेस्टपूर्वी शार्दुलच्या नावावर टांगती तलवार होती. मात्र जोहान्सबर्ग टेस्टमध्येही त्याला संधी मिळाली आणि या संधीचे सोने शार्दुलने केले. बॅटिंगमध्ये शून्यावर आऊट झाल्याचा वचपा त्याने बॉलिंगमध्ये काढला. त्याने आपल्या क्रिकेट करिअरमधील सर्वोत्तम स्पेल जोहान्सबर्गमध्ये टाकला.

जोहान्सबर्ग टेस्टच्या लंचमध्ये नाट्य, आफ्रिकेच्या टीमची थर्ड अंपायरकडे धाव!

शार्दुल ठाकूर याने आफ्रिकन टीमचे मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न धारधार बॉलिंगने उद्ध्वस्त केले. एल्गर, पिटरसन, ड्यूसेन, बवुमा, व्हेरेइन यांना आऊट करत शार्दुलने आफ्रिकेच्या बॅटिंग लाईनलाच पवेलीयनचा रस्ता दाखवला. 17.5-3-61-7 असे शार्दुलचे बॉलिंग समिकरण (Rise of Lord Shardul) राहिले. दक्षिण आफ्रिकेमध्ये टीम इंडियाकडून सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला.

स्वप्नवत प्रवास

पालघर ते मुंबई असा लोकल प्रवास करून क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या शार्दुल ठाकूरचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास रंजक आहे. SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये चांगली कामगिरी करू शकेल असा ऑलराऊंडर शार्दुलच्या रुपाने टीम इंडियाला मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांतील त्याची आकडेवारीच बोलकी आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन टेस्टमधील ऐतिहासिक विजयात ऑलराऊंडर कामगिरी, इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्टच्या दोन्ही इनिंगमधील हाफ सेंच्युरी आणि कॅप्टन जो रुटसह महत्त्वाच्या विकेट्स आणि आता जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोक्याच्या क्षणी घेतलेल्या सात विकेट्समुळे टेस्ट क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर म्हणून शार्दुल (Rise of Lord Shardul) टीम इंडियाची पहिली चॉईस बनत चालला आहे.

कसा बनला लॉर्ड ठाकूर?

शार्दुलच्या ऐतिहासिक स्पेलनंतर त्याचा मुंबईचा साथिदार धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) याने तो ‘लॉर्ड ठाकूर’ कसा बनला यामागील अनेक रहस्य उलगडले आहेत. शार्दुलच्या लॉर्ड बनण्यामागे टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान ( Zaheer Khan) याचेही योगदान असल्याचे धवल म्हणाला. मैदानात सर्वोत्तम खेळ दाखवायचा असेल तर तुला वजन कमी करून फिटनेस राखावा लागेल असा सल्ला झहीरने शार्दुलला रणजी ट्रॉफीवेळी दिला होता. यानंतर 83 किलो वजन असलेल्या शार्दुलने फिटनेसवर काम केले आणि 13 किलोंनी वजन कमी केले.

असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

झहीरच्या सल्ल्यावरून शार्दुलने बॉलिंगचा वेग आणि बाउंन्सर यावरही काम केले. फिटनेस सुधारल्याने त्याचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची उत्सुकताही वाढली आणि मैदानात तो अधिक आक्रमक खेळ करू लागला. एका फास्ट बॉलरकडे जो स्पार्क असायला हवा तो शार्दुलमध्ये दिसतो, असे धवल म्हणाला.

शाळेतील किस्सा

धवल कुलकर्णीप्रमाणे शार्दुलचा लहानपणीचा मित्र सिद्धेश लाड (Siddhesh Lad) यानेही एक किस्सा सांगितला. मुंबईत स्कूल लेव्हलची मॅच दोघे एकत्र खेळत होते. या मॅचमध्ये शार्दुलने चांगली कामगिरी करूनही तो हिरमुसला होता. मोठ्या मॅचमधील कामगिरी महत्त्वाची असते, छोट्या टीमला हरवून काय फायदा? असे त्यावेळी शार्दुल (Rise of Lord Shardul) म्हणाल्याचे सिद्धेश लाड याने सांगितले. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने वृत्त दिले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading