फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दोन्ही टीममध्ये तीन टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. जोहान्सबर्गच्या वॉण्डरर्स मैदानावर सुरू असलेली सीरिजमधील दुसरी टेस्ट (India vs Saouth Africa) रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. चांगली आघाडी घेण्याच्या स्थितीत असलेल्या टीम इंडियाने लागोपाठ तीन विकेट्स गमावल्या. रहाणे-पुजाराने चांगला पाया रचल्यानंतर त्यावर कळस चढवण्याचा जबाबदारी ऋषभ पंतवर होती, मात्र पंतने आततायीपणे आपली विकेट फेकली (Rishabh Pant Fail) आणि टीम इंडिया संकटात सापडली.

बेजबाबदार फटका

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपली दुसरी इनिंग सुरू केली. दुसऱ्या दिवशी नॉटआऊट असलेले अजिंक्य रहाणे
(Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी आक्रमक बॅटिंग केली. त्यांनी तिसऱ्या विकेट्ससाठी 100 हून अधिक रनची पार्टनरशिप केली. यादरम्यान दोघांनीही हाफ सेंच्युरी पूर्ण केली. मात्र हाफ सेंच्युरीनंतर रबाडाच्या (Kagiso Rabada) बॉलिंगवर दोघे आऊट झाले.

12 वर्षांपासून संधीची वाट पाहणारा क्रिकेटपटू भावूक, रेड बॉल हातात घेऊन केली विनंती

रहाणे आऊट झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला. पंतसमोरच पुजाराची विकेट गेली. त्यावेळी टीम इंडियाचा स्कोर 4 आऊट 163 होता. रहाणे-पुजाराने 4 च्या सरासरीने रन वसूल केले होते. ही सुरूवात पुढे नेण्याची जबाबदारी पंतकडे होती. लोअर ऑर्डरला रविंद्र जडेजासारखा ऑलराऊंडर नसल्याने पंतची जबाबदारी अधिक वाढली होती. परंतु पंतने (Rishabh Pant Fail) अक्षरश: आपली विकेट फेकली. 3 बॉलमध्ये एकही रन न करता तो आऊट झाला.

बेजबाबदारपणा!

लागोपाठच्या दोन ओव्हरमध्ये रबाडाने रहाण-पुजाराची विकेट घेतली होती. रबाडाला सूर सापडला होता आणि त्याच्याच बॉलिंगवर अनावश्यक शॉट मारण्याच्या नादात पंत आऊट झाला. पंतने विकेट गिफ्ट (Rishabh Pant Fail) केल्यामुळे कॉमेंट्री करणारा गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही संताप व्यक्त केला. हा बावळटपणा असल्याची बोचरी टीका गंभीरने केली. तर गावसकर यांनीही नाराजी व्यक्त करत जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असल्याचे म्हटले.

दरम्यान, धोनीचा (MS Dhoni) वासरदार असे मानला जाणारा ऋषभ पंत गेल्या काही टेस्टमध्ये सतत फ्लॉप होत आहे. अहमदाबादमध्ये 101 रनची खेळी केल्यानंतर त्याला मागील 13 इनिंगमध्ये फ्लॉप गेला असून फक्त एकदा 50 चा आकडा गाठता आला. यादरम्यान तो 6 वेळा 10 चा आकडाही ओलांडू शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे मॅचची परिस्थिती न पाहता मोठा शॉट खेळण्याच्या नादात पंत आऊट (Rishabh Pant Fail) होतोय. त्यामुळे हेड कोच राहुल द्रविडची (Rahul Dravid) काळजी वाढली आहे.

टीम इंडियाच्या Next Generation चा सुपरस्टार, भविष्यातील कॅप्टन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: